बॉलीवूडचा खलनायक डॅनी डँग्नोपाच्या नावाचा असा आहे किस्सा..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

बॉलीवूड मध्ये जितकी लोकप्रियता हिरोला मिळते तितकीच किंवा त्याहून जास्त खलनायक साकारण्याऱ्याला मिळते..बॉलीवूडच्या याच खलनायकांपैकी एक गाजलेलं नाव म्हणजे डॅनी डॅन्गझोपा..डॅनिंचा आज 72 वा वाढदिवस...चाहत्यांकडून आज त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे...

बॉलीवूड मध्ये जितकी लोकप्रियता हिरोला मिळते तितकीच किंवा त्याहून जास्त खलनायक साकारण्याऱ्याला मिळते..बॉलीवूडच्या याच खलनायकांपैकी एक गाजलेलं नाव म्हणजे डॅनी डॅन्गझोपा..डॅनिंचा आज 72 वा वाढदिवस...चाहत्यांकडून आज त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे...

हेही वाचा : माथेरान मिनी ट्रेन प्रेमींसाठी खुषखबर

अग्निपथ, अंदर बाहर, हम, अंधा कानून, चुनौती, इंडियन, घातक, क्रांतिवीर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे..या सिनेमातील त्यांची व्यक्तिरेखा कोणीच विसरू शकत नाहीत..अभिनय क्षेत्रासोबत डॅनी पर्यावरणातील उपक्रमात आवर्जून सहभाग घेताना दिसतात..या व्यतिरिक्त त्यांना गायन आणि चित्रकला याची देखील आवड आहे..

Image result for danny denzongpa

डॅनी यांचा बॉलिवूड मधील सुरुवातीचा प्रवास खूप खडतर होता..त्यांना हिंदी भाषेशी जुळवून घेणं कठीण जात होतं..मूळचे उत्तर पूर्व भारतातील असणारे डॅनी हे मग खळखळत्या समुद्रासोबत गप्पा मारायचे..हे तंत्र वापरून त्यांनी हिंदी भाषेवर चांगली पकड मिळवली..

हेही वाचा : अमेरिकेकडून मराठीचा असाही सन्मान

डॅनी यांचा नावाचा एक किस्सा आहे.. ते पुण्याच्या एफटीआयआय मध्ये जेव्हा शिकायला होते तेव्हा त्यांच्या Thsering Phintso Denzongpa या खऱ्या नावाची खिल्ली उडवली जायची..तेव्हाची त्यांची वर्गमैत्रीण जया भादुरी(बच्चन) यांनी त्यांना डॅनी हे नाव देऊ केलं...आणि मग पुढे बॉलिवूड मध्ये ते डॅनी याच नावाने प्रसिद्ध झाले..डॅनी यांच्या वाट्याला ज्या ज्या भूमिका आल्या त्या मनापासून निभावत त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित केली...

Danny Denzongpa 72nd Birthday know interesting facts about his name 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danny Denzongpa 72nd Birthday know interesting facts about his name