सुपरस्टार रजनीकांत नव्या दमदार अवतारात ; पाहा पोस्टर

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचा आगमी चित्रपट 'दरबार' चा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर रजनीकांतच्या दमदार लुकसह नुकताच दुसरा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

मुंबई : साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचा आगमी चित्रपट 'दरबार' चा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर रजनीकांतच्या दमदार लुकसह नुकताच दुसरा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये रजनीकांत लोखंडी गजांना ढकलताना दिसत आहे. 

'ओणम' सणाच्या मुर्हुतावर आज संध्याकाळी 'लायका प्रोडक्शन' ने ट्विटरवर पोस्टर अपलोड केला आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याची भुमिका साकारणार आहे. पोस्टरमधल्या दमदार लुकनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. पहिल्या पोस्टरच्या तुलनेत दुसरा पोस्टर अतिशय साधा आहे. 

चित्रपटामध्ये रजनीकांतसोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. याशिवाय सुनील शेट्टी आणि प्रतिक बब्बर यामध्ये असणार आहेत. अनिरुद्ध रवीचंदर सिनेमाला गाणं देणार आहेत. तर सिनेमाच्या कॅमेराचं काम संतोष सिवन यांनी केलय. विशेष म्हणजे रजनीकांत याचा हा 167 वा चित्रपट असणार आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणारा रजनीकांत याआधीदेखील पोलिसाच्या व्यक्तीरेखेमधून तमिळ आणि हिंदी सिनेंमातून दिसला आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी पोंगल सणाच्या मुर्हुतावर प्रदर्शित होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darbar second poster out!