वडिल सैफ अली खान सोबत स्क्रीन शेअर करेल सारा खान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

तिसऱ्या सिनेमात सारा पहिल्यांदाच वडिल सैफ अली खान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूड डेब्यू करायला तयार आहे. 'केदारनाथ' या तिच्या पहिल्या सिनेमातून ती लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. शिवाय 'सिंबा' सिनेमाही तिच्या पदरी पडला आहे. या सिनेमाची शुटींग सध्या सुरु आहे. पदार्पणातच दिग्दर्शक अभिषेक कपूर, रोहित शेट्टी आणि करण जोहर यांच्यासोबत सारा काम करत आहे. आता सारा तीसरा सिनेमाही लवकरच साइन करणार आहे. जो तिच्यासाठी खुप कास असेल.

saif and sara

या तिसऱ्या सिनेमात सारा पहिल्यांदाच वडिल सैफ अली खान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सुत्रांनुसार, फिल्मीस्तान चे दिग्दर्शक नितीन कक्कड यांचा हि सिनेमा असेल. सिनेमाची कथा मुलगी आणि वडिलांचे नाते यावर आधारीत असेल. सिनेमाची कथा सैफ आणि सारा यांना आवडली आहे. म्हणून आता सिनेमाची शुटींग लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. 

'केदारनाथ' मध्ये साराच्या अपोजिट सुशांत सिंह राजपूत आहे आणि 'सिंबा' मध्ये रणवीर सिंग सोबत सारा दिसेल.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daughter Sara Ali Khan And Father Saif Ali Khan Team Up For A Film