ती मुलगी आईसाठी नवरा शोधतेय!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

एक मुलगी आपल्या आई साठी नवरदेव शोधत असल्याचं अगळंवेगळं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक मुलगी आपल्या आईसाठी नवरदेव शोधत असल्याचं अगळंवेगळं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीचं ट्वीटरवर खुप कौतुक होत आहे. आस्था वर्मा या मुलीचं नाव आहे. या मुलीनं आपल्या आईसोबतचा सेल्फी ट्वीट केला आहे.

तीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, मी माझ्या आईच्या लग्नासाठी एका हॅन्डसम व्यक्तीच्या शोधात आहे. तो व्यक्ती, शाकाहारी असावा, दारू न पिणारा असावा, स्वयंपुर्ण असावा. 

Looking for a handsome 50 year old man for my mother! :)
Vegetarian, Non Drinker, Well Established. #Groomhuntingpic.twitter.com/xNj0w8r8uq

— Aastha Varma (@AasthaVarma) October 31, 2019

आस्थानं यासाठी टिंडरपासून ते शादी डॉट कॉमपर्यंत अनेक मॅन्ट्रीमोनियल संकेतस्थळांचा वापर केला आहे. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचं तिनं म्हटलंय.

त्यामुळे आईच्या आनंदासाठी आस्थानं ट्वीटरवर पोस्ट केली आहे. पारंपारिक आणि रुढिवादी विचारांना या पोस्टनं छेद दिला असल्याच्या प्रतिक्रीया नेटिझन्सकडून व्यक्त होत आहेत. अनेकांनी तीच्या या प्रयत्नाला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहिंनी कौतुकही केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daughter searching groom for mother takes twitters help netizens appreciated her gesture