'दे धक्का'चा सिक्वल येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

de-dhakka-2.jpg
de-dhakka-2.jpg

एका सामान्य कुटुंबाची सामान्यातून असामान्याकडे नेणारी कथा 2008 मध्ये महेश मांजरेकरांनी आपल्या भेटीला आणली होती. 'दे धक्का' या चित्रपटातून त्यांनी एका स्वप्न पाहणार्‍या वडिलांची आणि त्यांचे स्वप्न पाहून त्याच्या पूर्णत्वासाठी झटणार्‍या मुलीची कहाणी आपल्या समोर मांडली. काहीतरी मिळवण्याच्या जिद्दीमध्ये पूर्ण परिवाराची असलेली साथ, हे सगळं या चित्रपटाने आजही टिकवून ठेवलं आहे.  

एक उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक असलेले मांजरेकर या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत आहेत. दे धक्का-2 असे या चित्रपटाचे नाव आहे. मांजरेकर यांनी आपल्या ट्विटर आणि  इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'वेलकम टू लंडन' असे लिहीले असल्यामुळे या चित्रपटाचे लंडनशी काहीतरी कनेक्शन असल्याचे समजून येते. चित्रपटात अभिनेत्री मेधा मांजरेकर, अभिनेते शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे प्रमुख भूमिकेत असून बाल कलाकारांना अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

दे धक्काची चर्चा बाॅलिवूडमध्ये ही झाली, त्याच्या हिंदी रिमेक हद्दल काही काळापूर्वी बोलले जात होते. आजही हा सिनेमा आपल्यासाठी खास असताना महेश मांजरेकर त्याचा सीक्वेल प्रदर्शित करणार आहेत. 'दे धक्का- 2' 3 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दे धक्का 2 च पोस्टर नुक्तस लाँच करण्यात आला.

‘दे धक्का-2’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती यतिन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. पोस्टरमध्ये 'वेलकम टू लंडन' असे लिहीले असल्याने, यावेळी ह्या सिनेमाचा प्रवास आपल्याला परदेशवारी घडवणार असे दिसतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com