"डिअर जिंदगी'चा गल्ला 20 कोटी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

शाहरुख खान व आलिया भट यांचा "डिअर जिंदगी' हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. चुलबुली आलियाचा तरल व शाखरुखचा कसदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. शिवाय कथानकही वेगळे असल्याने "डिअर जिंदगी'ला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

त्यामुळेच प्रदर्शनापासून दोन दिवसांत या चित्रपटाने 20 कोटी रुपयांचा गल्ला जमविला. गौरी शिंदे हिने दिग्दर्शित केलेल्या "डिअर'बद्दल खूप उत्सुकता होती. त्यामुळे देशभरातील बाराशे चित्रपगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्‍शन 8.75 कोटीपर्यंत पोचले. त्यानंतर ते वाढतच गेला. यावरून नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईचा फटका याला बसल्याचे दिसत नाही.

Web Title: "Dear zindagi drove 20 million