मुलीच्या निधनानंतर अभिनेत्री आईनेही सोडले प्राण

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

लॉस एंजल्स- अभिनेत्री कॅरी फिशर यांच्या निधनानंतर त्या धक्क्याने दुसऱ्याच दिवशी त्यांची आई ज्येष्ठ अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉलिवूडमधील 1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये मेगास्टार म्हणून गाजलेल्या अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स यांचे आज निधन झाले. "ती आता कॅरीसोबत आहे," असे उदगार त्यांचे पुत्र टोड फिशर यांनी काढले.

रेनॉल्ड्स या 84 वर्षांच्या होत्या. त्यांना स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्टार वॉर्समुळे 'प्रिन्सेस लेआ' म्हणून ओळखली जाणाऱ्या कॅरी फिशर यांचे मंगळवारी निधन झाले होते. 

रेनॉल्ड्स यांचे पुत्र टोड फिशर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "माझ्या आईचे काही वेळापूर्वीच निधन झाले. ती सकाळीच माझ्याशी बोलली. मला कॅरीची आठवण येतेय असे ती तेव्हा मला म्हणाली."
टोड फिशर यांनी आईच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट केले नाही. रेनॉल्ड्स या श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार करीत होत्या. 
"ती आता कॅरीसोबत आहे," अशा भावना त्यांचे टोड फिशर यांनी व्यक्त केल्या.
 
Web Title: Debbie Reynolds dies one day after daughter Carrie Fisher passes

टॅग्स