Deepak Tijori : 'आशिकी' फेम अभिनेत्याला निर्मात्यानेच 2.6 कोटींना गंडवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Tijori Filed Case:

Deepak Tijori : 'आशिकी' फेम अभिनेत्याला निर्मात्यानेच 2.6 कोटींना गंडवलं

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरीसोबत फसवणूक झाल्याच प्रकरण समोर आलं आहे. याबाबत स्वत: अभिनेत्याने आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दीपक तिजोरीने त्यांची २.६ कोटींची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मुंबई पोलिसांकडे तक्रार करताना, अभिनेत्याने सहनिर्माता मोहन नाडरवर चित्रपटाच्या लोकेशनच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला आहे.

मोहन नाडर हा दीपक तिजोरीसोबत थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करत होता. 15 मार्च रोजी, मुंबईतील आंबोली पोलिस स्टेशनमध्ये सहनिर्माते मोहन नाडर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

त्याच्या तक्रारीचच्या आधारे पोलिसांनी मोहन गोपाल नाडर यांच्याविरुद्ध कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये दीपक आणि नाडर यांनी टिप्सीसाठी करार तयार करून त्यावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अनेकदा विचारणा करूनही नाडरने पैसे परत केले नाहीत.

दुसरीकडे, या प्रकरणावर अभिनेता दीपक म्हणतो की, नाडरने 2019 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठीत्याच्याकडून पैसे घेतले होते, अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, नाडरने लवकरच पैसे परत करणार असल्याचं त्याला सांगितलं होते. पण नंतर तो नाटक करु लागला आणि त्याचे चेक बाऊन्स झाले.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

दीपक तिजोरी ने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच तो दिग्दर्शन क्षेत्रातही उतरला. दीपकने 2003 मध्ये दिग्दर्शनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आणि जवळपास 33 वर्षांनंतर दीपक तिजोरी यांनी नाडरसोबत टिप्सी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू असल्याचे मानले जात होते. मात्र या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :Bollywood Newsmovie