दीपिकाला सापडलं थंगबली! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

तमिळ गर्ल मिन्नम्माच्या भूमिकेतील दीपिका पदुकोण तुम्हाला आठवतेय का? आठवणारच! कारण तिने ती भूमिका अप्रतिमच केली होती.

तिच्या साड्या, गजरे, दाक्षिणात्य लूक आणि तिची भाषा, खास करून तिचा तो थंगबली नावाचा संवाद तर आठवतोच आपल्याला. आता तुम्ही म्हणाल त्याचं काय? तर त्याचं कारण आहे दीपिकाला नुकतंच थंगबली नावाचं एक दाक्षिणात्य रेस्टॉरंट मुंबईतील माहीमध्ये सापडलं आहे.

त्यामुळे दीपिकाला खूपच आश्‍चर्य वाटलं. आपल्या सिनेमातील संवादाने प्रेरित होऊन असं नाव ठेवलं जाऊ शकतं, याचं दीपिकाला नवल वाटलं. तिने आपल्या पद्मावती सिनेमाच्या टीमला हे सगळं सांगितलं आणि तिने ठरवलंय की तिला जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून त्या रेस्टॉरंटमध्ये ती जाणार आहे. 

Web Title: Deepali found Thangabli!