असा झाला दीप-वीर लग्नसोहळा !

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने आपल्या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या विवाहाचे अनमोल क्षण शेअर केले आहेत. यांत दोघांचे विवाहमंडपातील दोन फोटो आहेत. पहिल्या फोटोत दीपिका आणि रणवीर कोंकणी पोशाखात तर दुसऱ्या फोटोत सिंधी पोशाखात दिसत आहेत. 

पहिल्या फोटोत रणवीरने पांढरी शेरवानी आणि दीपिकाने गोल्डन लाल काठाची साडी परिधान केलेली दिसत आहे; तर दुसऱ्या फोटोत रणवीरने लाल आणि गोल्डन रंगाची शेरवानी आणि फेटा तसेच दीपिकाने लाल- गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

बॉलिवूडची हॉट जोडी म्हणून पॉप्युलर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. प्रेमकहाणीप्रमाणेच दीप-वीर यांच्या लग्नाच्या चर्चाही गेल्या वर्षभरापासून रंगत होत्या. अखेर काल आणि आज दोन दिवसांच्या सोहळ्यात इटलीतील लेक कोमो येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली. या विवाहसोहळ्याबाबत दोन्ही कुटूंबाकडून कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. हा विवाहसोहळा फार खासगी पद्धतीने पार पडला. 13 नोव्हेंबरला दीप-वीर यांचा साखरपुडा पार पडला आणि काल कोंकणी पद्धतीने विवाह झाला असला तरी या कार्यक्रमांचा एकही अधिकृत फोटो आलेला नव्हता. चाहत्यांना मात्र आपल्या या फेवरेट जोडीला विवाह बंधनात अडकताना बघण्याची उत्सुकता होती. चाहत्यांची ही उत्सुकता या जोडीनं थोडी ताणलीच. या संपूर्ण सोहळ्यात कुणीही कुठल्याही कार्यक्रमाचे फोटो काढू नये याची खास दक्षता घेण्यात आली होती. त्यासाठी विवाहाला उपस्थित पाहुणेमंडळी ते या सोहळ्यासाठी काम करणारे कर्मचारी या सर्वांच्या मोबाईल कॅमेराला स्टिकर्स लावण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika and Ranveer First wedding photo viral