बॉलिवूड तारकांच्या उपस्थितीत 'दीपवीर'च्या रिसेप्शनला चारचाँद

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. रणवीर आणि दीपिका यांनी केलेला पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रणवीरने काळा रंगाचा सूट परिधान केला होता तर दीपकाने लाल रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला होता. 

मुंबई : बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे एकमेकांना सहा वर्षे डेट केल्यानंतर 14-15 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकले. शनिवारी रात्री त्यांच्या या सोहळ्यातील अखेरचे रिसेप्शन पार पडले. हे रिसेप्शन बॉलिवूडमधील तारेतारकांसाठी मुंबईतील ग्रॅंड हायत हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. 

या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. रणवीर आणि दीपिका यांनी केलेला पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रणवीरने काळा रंगाचा सूट परिधान केला होता तर दीपकाने लाल रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला होता. 

अमिताभ बच्चन, माधूरी दीक्षित, करिना कपूर, ऐश्वर्या बच्चन, संजय दत्त, शाहरुख खान या सर्व बड्या कलाकरांसह भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, पत्नी साक्षी आणि भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Good morning everyone The way sakshi looking at Dhoni . Couple Goals

A post shared by mahi7781 (@offl_mahifan) on

या सोहळ्यात रणवीर दीपिका यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व कलाकारांचे पेहरावही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika and ranveer reception attended by bollywood stars