Tiger vs Pathaan: पठाण आणि टायगर असून काय करायचं.. शेवटी दीपिका - कतरीनावाचून अडलंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan V/S Tiger Update News, pathaan, tiger, shah rukh khan, deepika padukon, katrina kaif, salman khan

Tiger vs Pathaan: पठाण आणि टायगर असून काय करायचं.. शेवटी दीपिका - कतरीनावाचून अडलंच

Pathaan V/S Tiger Update News: शाहरुख - दीपिकाच्या पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी कमावले. या दोघांची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली. यानिमित्ताने यशराज फिल्म युनिव्हर्समध्ये स्पाय युनिव्हर्स तयार होतंय.

पठाण नंतर आता बॉलीवूडमध्ये यशराज फिल्म्सच्या आगामी 'टायगर वर्सेस पठाण' या स्पाय मुव्हीची चर्चा रंगली आहे.

'पठाण' नंतर शाहरुख आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. यावेळी पडद्यावर पठाण आणि टायगर भिडलेले दिसणार आहेत.

पण अद्याप सिनेमातील अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. सिनेमात दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफ दोघीही आपला जलवा दाखवताना दिसणार की कोणी एकच अभिनेत्री असणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. पण आता दीपिका आणि कतरिनाच या दोघांसोबत झळकणार आहेत यावर शिक्कमोर्तब झालंय.

‘पठाण वर्सेस टायगर’ चे निर्माते हा सिनेमा एक भव्य ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.

शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असतील. या दोघांसोबत त्यांचे पार्टनर म्हणून दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या दोघींची जोडी दिसणार आहे.

एका न्यूज पोर्टलनुसार, ही पॉवर पॅक्ड टीम 24 जानेवारी २०२४ पासून शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही अभिनेत्री मूळ चित्रपटांमधून त्यांच्या भूमिका पुन्हा साकारणार आहेत.

हा चित्रपट पठाण आणि टायगरच्या शत्रुत्वाबद्दल नसून ते एका सामान्य खलनायकाशी लढण्यासाठी सैन्यात सामील होतील असं बोललं जातंय.

यशराज फिल्म्सचे स्पाय सिनेमे गेल्या काही वर्षांपासून बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहेत. २०१२ साली सर्वात आधी सलमान खानचा 'एक था टायगर' सिनेमा रिलीज झाला होता.

या सिनेमानं जोरदार कमाई केली होती. सिनेमाच्या यशाला पाहून मेकर्सनी २०१७ मध्ये 'टायगर जिंदा है' बनवला,जो हिट ठरला.

यशराज फिल्म्सने हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा 'वॉर' आणला ज्याच्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आणि आता शाहरुखच्या 'पठाण' सिनेमानं देखील अनेक रेकॉर्ड तोडत तगडी कमाई केली आहे.