'ओम शांती ओम', दीपिकानं नावचं बदललं

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 10 November 2020

ओम शांती ओम चित्रपटाला नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली. बॉक्स ऑफीसवर त्यावेळी कोट्यवधीची उलाढाल करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद करण्यात आली होती. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटांतील गाणीही तुफान लोकप्रिय झाली होती.

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिच्या ओम शांती ओम चित्रपटाला नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली. बॉक्स ऑफीसवर त्यावेळी कोट्यवधीची उलाढाल करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद करण्यात आली होती. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटांतील गाणीही तुफान लोकप्रिय झाली होती. अशा या चित्रपटांनिमित्त त्यातील कलाकारांनी ओम शांती ओमच्या त्या काळातल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या घटनेचे औचित्य साधून दीपिकाने आपल्या व्टिटर हँडलचे नाव बदलले होते. त्यामुळे नेटक-यांमध्ये कुतूहल होते. त्यांनीही तिच्या या नव्या नावाला पसंती दर्शवली. तिला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या. ओम शांती ओम या चित्रपटात दीपिकाने शांतीप्रिया ही भूमिका साकारली होती.

त्यामुळे तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचं नाव बदलून शांतीप्रिया असं ठेवल्याने तिच्याविषयी चर्चा रंगु लागली आहे. याशिवाय तिने डिस्प्ले इमेजदेखील चेंज केली आहे. डिस्प्ले इमेजवर तिने ओम शांती ओम चित्रपटातील शाहरुख आणि तिचा फोटो लावला आहे.

Image

ओम शांती ओम नंतर दीपिकाची लोकप्रियता वाढली. ती आता एक सेलिब्रेटी असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये पिकू, मस्तानी, रानी पद्मावती, मीनाम्मा, नैना या तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘ओम शांती ओम’ या चित्रपटानं त्यावेळचे सर्व रेकॉर्ड मो़डीत काढले होते. 2007 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता.

या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोनने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामुळे तिच्या करिअरमधील हा महत्त्वाचा चित्रपट असल्याचं म्हटलं जातं.  आता या चित्रपटाला १३ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचं नाव बदलल्याचं दिसून आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukon change her name on social account celebrating om shanti om 13 years