दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!; 'इथे' होईल सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलण्याचं टाळलं असलं तरी बी-टाउनच्या प्रत्येक कार्यक्रमाला दीपिका-रणवीर जोडीनं हजेरी लावायचे. 20 नोव्हेंबर 2018 ला दीपिका-रणवीर लग्नाचा बार उडवतील.

मुंबई - बी-टाउनची सगळ्यात लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षापासूनच सुरु झाल्या होत्या. आता मात्र या विवाहसोहळ्याची तारीख आणि जागा निश्चित करण्यात आली आहे. 

आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलण्याचं टाळलं असलं तरी बी-टाउनच्या प्रत्येक कार्यक्रमाला दीपिका-रणवीर जोडीनं हजेरी लावायचे. 20 नोव्हेंबर 2018 ला दीपिका-रणवीर लग्नाचा बार उडवतील. पाच वर्षापासून ही जोडी रिलेशनशीपमध्ये आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर दीपिका-रणवीर कडे चाहते टक लावून होते. ही प्रतिक्षा आता संपली आहे. 

Deepika Ranveer

काही महिन्यांपुर्वी वांद्रे येथे दीपिका तिच्या आईसोबत ज्वेलरी खरेदी करताना दिसली होती. त्यामुळे लग्नाच्या खरेदीला सुरवात झाल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली. 

अनुष्का-विराट प्रमाणेच हे दीपिका-रणवीर डेस्टिनेशन वेडींग करणार आहे आणि त्यांनी इटली हेच ठिकाण लग्नासाठी निवडलं आहे. इटली येथे या जोडीचं आवडतं ठिकाण मिलानमधील लेक कोमो किनाऱ्याजवळील व्हिलामध्ये दोघं लगीनगाठ बांधतील. लेक कोमो हे इटलीतील सर्वात प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन पेकी एक ठिकाण आहे. ऐल्पस पर्वतात वसलेलं हे ठिकाण आहे. रंगाबेरंगी घरांचे गाव आणि गॉथिक आर्किटेक्चर या ठिकाणाचे सौंदर्य अजुन वाढवते. 

Lake Como Italy

या लग्नाचे आमंत्रण मात्र अगदी मोजके म्हणजे 30 लोकांनाच देण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांत बॉलिवूड आणि इतर मंडळींसाठी मुंबईत ग्रँड रिसेप्शन असेल असंही म्हटलं जात आहे. 

Deepika Ranveer

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone And Ranveer Singhs Wedding Date Is Confirmed