शाहरूखसोबतच्या फिल्मला दीपिकाचा नकार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

दीपिका पदुकोनने आपल्या बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात किंग खानशाहरूखसोबतच्या रोमॅंटिक फिल्ममधून केली. बॉलीवूडच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये शाहरूख अन्‌ दीपिकाचं नाव सध्या घेतलं जातंय. शाहरूखही आपल्या चित्रपटातील नायिकेसाठी पहिली पसंती दीपिकालाच देतो. शाहरूखनं ब्रेक दिल्यानं त्याच्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या दीपिकानं सध्या तरी त्याच्याबरोबरच्या एका फिल्मची ऑफर चक्क धुडकावलीय.

कारण- अर्थात डेटस्‌चं. आनंद एल. राय यांनी आपल्या चित्रपटासाठी शाहरूखसोबत दीपिका व कतरिना कैफला फायनल केलं होतं. मात्र, आता दीपिकानं त्यातून माघार घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. खरं तर दीपिका या प्रोजेक्‍टची आतुरतेनं वाट पाहत होती; पण संजय लीला भन्साळींच्या "पद्मावती' चित्रपटामुळे तिनं नकार दिल्याचं समजतंय. चित्रीकरणात सारख्या अडचणी येत असल्यामुळे "पद्मावती' पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे. त्या चित्रपटाचं शेड्युल पुन्हा नव्यानं बनविलं जातंय. साहजिकच दीपिकाला आनंद एल. राय यांच्या चित्रपटाला नकार द्यावा लागला. बघूया, आता दीपिकाच्या जागी कोणाची वर्णी लागते ते... 
 
Web Title: Deepika Padukone ditches Shah Rukh Khan’s film