esakal | दीपिकाने लाईव्ह चॅट दरम्यान केली रणवीरची पोल-खोल, रणवीर म्हणाला 'तू थांब जरा दीपिका'

बोलून बातमी शोधा

ranveer deepika

यावेळी दीपिकाने रणवीर सिंगच्या बाबतीत असा काही खुलासा केलाय की जे त्याच्या चाहत्यांनाही देखील माहित नसेल.

दीपिकाने लाईव्ह चॅट दरम्यान केली रणवीरची पोल-खोल, रणवीर म्हणाला 'तू थांब जरा दीपिका'
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमध्येही बॉलीवूड सेलिब्रिटींचा मस्तीखोर अंदाज काही कमी होत नाही. बॉलीवूडची सगळ्यात हॉट आणि चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण. मस्ती करण्यामध्ये ही जोडी नेहमीच अग्रेसर असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी दीपिकाने रणवीर सिंगच्या बाबतीत असा काही खुलासा केलाय की जे त्याच्या चाहत्यांनाही देखील माहित नसेल.

हे ही वाचा: लॉकडाऊमध्ये अक्षय कुमारने केली शूटींगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल

रविवारी संध्याकाळी रणवीर सिंग आणि भारतीय फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीसोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत होता. लाईव्ह चॅटमध्ये रणवीरने त्याच्या सिने कारकिर्दीपासून ते त्याच्या वेगवेगळ्या खेळातील आवडीनिवडींबाबत चर्चा केली. जेव्हा खेळाचा विषय सुरु होता तेव्हा सुनीले छेत्रीने त्याला एका वाक्यावर पकडलं आणि मग रणवीरची बोलतीच बंद झाली. 

सुनील छेत्री त्याच्यासोबतचा जुना किस्सा शेअर करत सांगतो की, 'एकदा दीपिकासोबत बॅटमिंटन खेळताना तुला केवळ तीन पॉईंट्स मिळाले होते तेही दीपिकामुळे. हे ऐकल्यानंतर रणवीर जोरात ओरडत दीपिकाला म्हणतो की ती मुला एक्सपोझ करत आहेस, तु थांब जरा.' लाईव्ह चॅट दरम्यान दीपिका सुनीलचा हा किस्सा ऐकून त्याला थंब्सअपचा इशारा करत या गोष्टीला होकार देते. यानंतर दीपिका आणि सुनील हसायला लागतात. 

पुढे जाऊन सुनील रणवीरला सांगतो की, दीपिकाची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे डेटिंगच्या वेळी तिला तुझ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच लक्षात राहायच्या. तु तिला गाडीतून सोडायला जायचाय आणि मग तीला फुल द्यायचा. यावर रणवीर सांगतो, 'सगळ्या तरुणांनी लाईव्ह चॅटमधल्या या गोष्टीला नीट लक्षात ठेवा की तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही कसं जिंकू शकता ते. मी आधीपासूनंच ठरवलेलं की मला हिच्यासोबतंच माझं यापुढचं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे.'

deepika padukone expose to ranveer singh during live chat