esakal | दीपिकाच्या नव्या 2 BHK फ्लॅटची किंमत ऐकून व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

actress Deepika padukon

दीपिकाच्या नव्या 2 BHK फ्लॅटची किंमत ऐकून व्हाल थक्क

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिचे वडिल प्रकाश पदुकोण (prakash Padukone) यांनी बंगळुरुमध्ये (bangluru) आलिशान सर्व्हिस अपार्टमेंट (Service apartment) विकत घेतलं आहे. त्यांनी या अपार्टमेंटचे रजिस्ट्रेशन केलं आहे. तब्बल ६.७९ कोटी रुपये मोजून दीपिका आणि तिच्या वडिलांनी हे अपार्टमेंट विकत घेतलय.

प्रकाश पदुकोण हे भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. झॅपकी डॉट कॉमने रजिस्ट्रेशनची ही कागदपत्र मिळवली आहेत. कागदपत्रातील नोंदीनुसार, ७ ऑगस्ट २०२१ रोजी विक्रीचा हा व्यवहार रजिस्टर करण्यात आला. स्टॅम्प ड्युटीपोटी ३४.६४ लाख रुपये भरण्यात आले. दीपिकाचा हा २ BHK फ्लॅट असून २२ व्या मजल्यावर आहे. मनी कंट्रोलने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: OBC उपसमिती नेमकी कुठे हरवली? गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुदकोण यांच्या कार्यालयात काही प्रश्न पाठवण्यात आले होते. पण त्यांना उत्तर मिळालेले नाही. बेल्लारी रोडवर ही इमारत आहे. या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या काही जणांमध्ये दीपिका आणि तिचे वडिल आहेत.

loading image
go to top