'कान्स'चं रेड कार्पेट दीपिकानं गाजवलं, बघा हा लूक!

शनिवार, 18 मे 2019

कान्सच्या दुसऱ्या दिवशीच्या टप्प्यात दीपिकाने रेड कार्पेटवर आपली हजेरी लावली. रेड कार्पेटवरील दिपिकाचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यात तिने निऑन ग्रीन रंगाचा गाऊन आणि गुलाबी रंगाचा हेडड्रेस लावला आहे. या वेगळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तीचे सौंदर्य खुललेलं आहे, यामुळे तिचा हा लूक तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पदुकोनचे दोन दिवसांपासून काही फोटो व्हायरल होत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील हे फोटो असून ती एका हटके लूकमध्ये दिसत आहे. तिचा ड्रेस, अॅक्सेसरीज, मेकअप आणि तिची स्टाईल अशा सर्व गोष्टींचं कौतुक होत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हे खास फोटो शेअर केले आहेत. 

कान्सच्या दुसऱ्या दिवशीच्या टप्प्यात दीपिकाने रेड कार्पेटवर आपली हजेरी लावली. रेड कार्पेटवरील दिपिकाचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यात तिने निऑन ग्रीन रंगाचा गाऊन आणि गुलाबी रंगाचा हेडड्रेस लावला आहे. या वेगळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तीचे सौंदर्य खुललेलं आहे, यामुळे तिचा हा लूक तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

प्रतिष्ठीत अशा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 ला 14 मे पासून सुरवात झाली. जगभरातील तारे-तराकांसाठी महत्त्वाचा असलेला कान्स फिल्म फेस्टिव्हल हा दरवर्षी कलाकारांच्या लूकमुळे आणि पेहरावामुळे कायमच गाजतो. जगभराचे लक्ष रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या तारे-तारकांकडे असते.