दीपिका पदूकोणने शेअर केलं मीम, स्वतःला म्हणाली काजू कतली तर रणवीरला म्हटलं मोतिचूर का लड्डू

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 16 November 2020

दीपिकाने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिची तुलना काजु कतलीसोबत केली आहे.

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण नेहमीच चर्चेत असते. दीपिकाने नुकतंच पती रणवीर सिंहसोबत लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. ती नेहमीच तिचे आणि रणवीरचे फोटो शेअर करत असते. आता नुकताच दीपिकाने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिची तुलना काजु कतलीसोबत केली आहे.

हे ही वाचा: 'द कपिल शर्मा शो'मध्ये मामा गोविंदासमोर परफॉर्म करण्यासाठी कृष्णाने दिला होता नकार, म्हणाला..  

दीपिका पदूकोण सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असते. याशिवाय ती कित्येकदा मजेशीर मीम्स शेअर करताना दिसते. नुकतंच तिने स्वतःवर बनलेलं एक मीम शेअर केलं आहे. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतंय. दीपिकाने तिच्या एंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे मीम शेअर केलंय. या मीममध्ये दीपिका पदूकोण सफेद रंगांच्या कपड्यांमध्ये दिसून येतेय. तर तिच्या बाजुला काजु कतली ठेवलीये. जिथे काजु कतलीच्या फोटोवर तिचं नाव लिहिलंय. तर दीपिकाच्या फोटोवर काजु कतली प्रो मॅक्स असं लिहिलंय.

याशिवाय दीपिकाने आणखी एक मीम शेअर केलंय. ज्यामध्ये रणवीर आणि दीपिका या दोघांची तुलना गाजर का हलवा आणि मोतीचूर लड्डूसोबत केली आहे. दीपिकाने दिवाळीच्या खास दिवशी तिचा आणि रणवीरचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी दीपिका आणि रणवीरने त्यांचा लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या फोटोमध्ये रणवीरने दीपिकाला त्याची गुडिया म्हटलं होतं. रणवीरचं हे कॅप्शन देखील चाहत्यांमध्ये चांगलंच ट्रेंड झालं होतं.     

deepika padukone share meme on her diwali outfit says herself kaju katli pro max  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone share meme on her diwali outfit says herself kaju katli pro max