दीपिका पदूकोणने गुगलवर शेवटची शोधलेली 'ही' गोष्ट पाहून तुम्हीही व्हाल हैराण, इंस्टाग्राम चॅलेंजमध्ये खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 9 January 2021

दीपिकाने तिच्या इंस्टास्टोरीवर तिच्या बालपणीचा फोटो, तिचा आवडता पदार्थ, ती कोणाच्या जास्त जवळची आहे आणि शेवटचं गुगलवर काय सर्च केलं होतं यासारख्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

मुंबई- बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदूकोणने तिच्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. सिनेमांव्यतिरिक्त दीपिका सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने खरं तर दीपिकाने तिच्या सगळ्या सोशल मिडियावरील पोस्ट डिलीट करत चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र ती आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर ऍक्टीव्ह झाली आहे. सध्या इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये 'पोस्ट अ पिक्चर चॅलेंज' खूप ट्रेंड होतंय. अशातं दीपिकाने देखील यात सहभाग घेतला आहे आणि अनेक मजेशीर गोष्टी शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 

हे ही वाचा: आमिर खान मुलांसोबत खेळला गल्ली क्रिकेट, मात्र 'या' गोष्टीमुळे होतोय जबरदस्त ट्रोल  

दीपिकाने तिच्या इंस्टास्टोरीवर तिच्या बालपणीचा फोटो, तिचा आवडता पदार्थ, ती कोणाच्या जास्त जवळची आहे आणि शेवटचं गुगलवर काय सर्च केलं होतं यासारख्या गोष्टी शेअर केल्या आहेत. आता दीपिकाच्या चाहत्यांना तर दीपिकाच्या काही गोष्टींची उत्तरं तर माहित आहेत मात्र दिपीकाने शेवटचं गुगलवर काय सर्च केलं होतं हे जाणून घेणं खूप मनोरंजक ठरलं. जर तुम्हीही हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल की दीपिकाने शेवटची कोणती गोष्ट गुगलवर सर्च केली होती तर त्याचं उत्तर आहे ग्लोव्ह्जची साईज.

दीपिका पादुकोण

आता दीपिकाच्या या सर्चमुळे तिचे चाहते हैराण होऊ शकतात की दीपिका अशा प्रकारच्या गोष्टी देखील गुगलवर सर्च करु शकते?  तसं तर एकदा दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहने खुलासा केला होता की दीपिका खूप घरेलु आहे आणि प्रत्येक गोष्टीची खूप चागंल्या प्रकारे काळजी घेते.तर दुसरीकडे दीपिकाच्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती कोण आहेत यावर तिने पती रणवीर सिंह आणि बहीण अनिषा पदूकोणचा फोटो पोस्ट केला आहे.

दीपिका पादुकोण

यासोबतंच चीट जेवणामध्ये बिरयानीचा फोटो पोस्ट केला आहे. दीपिका देखील तिच्या डाएट दरम्यान चीट करते आणि बिरयानी खायला खूप आवडते. याव्यतिरक्त पीकूमधील आवडता क्षण सांगताना ते दिवंगत अभिनेता इरफान खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर तमाम चाहत्यांचं प्रेम तिला मिळत आहे.  

deepika padukone takes post a picture challenge on instagram reveals what was her last google search  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone takes post a picture challenge on instagram reveals what was her last google search