दीपिका पदूकोण सुरुवातीच्या काळात रोज 'या' अभिनेत्याच्या फोटोला किस करुन झोपायची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

अभिनेत्री दीपिका पदूकोणचं बहीण अनीशसोबत चांगलं बॉन्डिंग आहे. दोघीही एकमेकींसोबत त्यांचे सिक्रेट्स शेअर करतात. एवढंच नाही तर दोघींना सुरुवातीच्या काळात एकाच सेलिब्रिटीवर क्रश होता.

मुंबई- अभिनेत्री दीपिका पदूकोणचं बहीण अनीशसोबत चांगलं बॉन्डिंग आहे. दोघीही जेव्हा सोबत असतात तेव्हा धमाल उडवून देतात. सोशल मिडियावरचे दोघींचे फोटो पाहिल्या नंतर त्यांच्यातील बॉन्डिंगचा तुम्हाला अंदाज येईल. दोघीही एकमेकींसोबत त्यांचे सिक्रेट्स शेअर करतात. एवढंच नाही तर दोघींना सुरुवातीच्या काळात एकाच सेलिब्रिटीवर क्रश होता.

हे ही वाचा: अभिनेत्री मुमताजचं निधन? पंजाबच्या मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सोशल मिडियावर अफवांच पीक 

अभिनेत्री दीपिका पदूकोणने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ती आणि तिची बहीण अनिशा एकाच खोलीत राहत होत्या. या खोलीत त्या एकमेकींसोबत कित्येक तास खेळत राहायच्या.त्यावेळी तिने असं सांगितलं होतं की आम्ही ज्या खोलीत राहायचो त्या खोलीत एकाच अभिनेत्याचे पोस्टर्स होत तो अभिनेता म्हणजे लिओनार्डो दी कॅप्रिओ. दोन्ही बहिणींना हा अभिनेता खूप आवडायचा. दीपिकाने सांगितलं होतं की, आम्ही दोघी बहीणी झोपण्या अगोदर लिओच्या फोटोला न चुकता किस करायचो.

Leonardo DiCaprio: All his best photos through the years

दीपिका सध्या रणवीरसोबत मुंबईतील घरी राहतेय.मात्र ती तिच्या बहिणीला खूप मिस करतेय.नुकताच दीपिकाने सोशल मिडियावर तिच्या बहीणीसोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिलं होत, पीनट तुझी खूप आठवण येत आहे.

दीपिका आणि रणवीर त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावर वेगवेगळ्या अपडेट शेअर करत असतात. दोघांचाही '८३' हा सिनेमा रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊनमुळे हा  सिनेमा पुढे ढकलल्याचं कळतंय. या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या चाहत्यांना या सिनेमाची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे.    

deepika padukone used to kiss hollywood actor leonardo dicaprio before sleep  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone used to kiss hollywood actor leonardo dicaprio before sleep