दीपिका पदुकोण तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, 'हे' आहे खास कारण..

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तिचे फोटो व्हयरल झाले आहेत.
Deepika Padukone visits Tirupati balaji temple with father Prakash Padukone
Deepika Padukone visits Tirupati balaji temple with father Prakash Padukonesakal

Deepika padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण कायमच आपले हटके लुक मुळे चर्चेत असते. शिवाय रणवीर आणि तिच्या नात्यावरही ती बऱ्याचदा बोलत असते. दोघेही सोशल मोडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकतेच दिपकने कान्स चित्रपट महात्सवात आपली जादू दाखवली. तिच्या लूकने आणि भाषणाने सारेच घायाळ झाले. यंदा मात्र दीपिका अत्यंत पारंपरिक अंदाजात समोर आली आहे. शुभ्र कपडे, अंगावर शाल परिधान केलेले तिचे फोटो व्हयरल झाले.यानंतर ती तिरुपती बालाजीला गेली असल्याचे समोर आले. आज एका खास कारणामुळे ती बालाजीला दर्शनासाठी गेली होती. (Deepika Padukone visits Tirupati balaji temple with father Prakash Padukone)

Deepika Padukone visits Tirupati balaji temple with father Prakash Padukone
काय.. टप्पूही सोडणार 'तारक मेहता..' मालिका? मोठा धक्का..

आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणाऱ्या दीपिकाने कुटुंबाची परंपरा राखण्याचे कामही उत्तम पद्धतीने केले आहे. शुक्रवारी तिचे वडील आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या 67 व्या वाढदिवसा निमित्त तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात त्यांनी भेट दिली. यावेळी दीपिकासोबत तिचे आई-वडील आणि बहीण अनिशा असा संपूर्ण परिवार होता. दीपिकाचे मंदिरातील काही फोटो तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने यावेळी फिकट गुलाबी लखनवी सूट आणि रेशमी शाल अंगावर घेतलेली दिसली. ही शाल दीपिकाला मंदिराकडून आशीर्वाद म्हणून मिळाली होती. तिच्या संपूर्ण कुटुंबाचा सन्मान मंदिर प्रशासनाने यावेळी केला.

प्रकाश पदुकोण यांना मानाचे अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 1980 मध्ये, त्यांनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली, ही जगातील सर्वात जुनी बॅडमिंटन स्पर्धा आहे. दीपिका तिच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com