दीपिका करणार 'या' सिनेमाची सहनिर्मिती !

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 October 2018

आतापर्यंत तरी दीपिकाकडे कुठलाही नवा सिनेमा नव्हता. पण लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिका काम करणार असल्याचे समजते.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण हिचा पुढचा प्रोजेक्ट काय असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. पण ही उत्सुकता आता संपली असून दीपिका लवकरच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिका काम करणार आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. त्यातून खचून न जाता लक्ष्मीने आपले विश्व पुन्हा उभे केले. अॅसिड हल्ल्याच्या शिकार झालेल्या मुली आणि स्त्रियांसाठी तिने स्वयंसेवी संस्था सुरु केली. 

दीपिकाकडे 'पद्मावत'नंतर आणखी एक सिनेमा होता. ज्याचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करत आहेत. मात्र या सिनेमातील दीपिकाचा सहकलाकार इरफान खानची तब्येत बिघडल्याने सिनेमा सध्या थांबला आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी दीपिकाकडे कुठलाही नवा सिनेमा नव्हता. पण लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिका काम करणार असल्याचे समजते. हा सिनेमा मेघना गुलजार दिग्दर्शित करतील आणि विशेष म्हणजे दीपिका सिनेमाची सहनिर्मितीही करणार आहे. सिनेमाचे शूटींग फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु होईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone will coproduce this film