जुहीनं थोडक्यात आपली बाजू मांडावी, कोर्टाचा आदेश

न्यायालयानं दूरसंचार विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे वकिल अमित महाजन (Amit Mahajan) यांना दीड पानाचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
Juhi Chawala
Juhi ChawalaTeam esakal

मुंबई - देशात 5 जी नेटवर्कच्या (5 G Network) संदर्भात याचिका दाखल करणा-या जुहीला (Juhi Chawala) न्यायालयानं (Court) आपली बाजू थोडक्यात मांडण्यास सांगितले आहे. यापूर्वी जुहीनं 5 जी नेटवर्कच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय झाली होती. याप्रकरणाची न्यायालयानं दखल घेतली असून त्याबाबत पुढील दिवसांत निर्णय देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पर्यावरण आणि व्यक्तीच्या जीवाला धोका या नेटवर्कमुळे निर्माण होऊ शकतो. असे जुहीनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. (delhi high court asks juhi chawla to file a short note on 5g wireless networks)

याशिवाय न्यायालयानं दूरसंचार विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे वकिल अमित महाजन (Amit Mahajan) यांना दीड पानाचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) बुधवारी जुहीला तिचं म्हणणं संक्षिप्तमध्ये मांडण्यास सांगितले आहे. जुहीनं सोमवारी उच्च न्यायालयामध्ये 5 जी नेटवर्कच्या विरोधात धाव घेतली होती. त्यामुळे सोशल मीडियावर जुहीवर टीका आणि कौतूक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

जुहीनं आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण सातत्यानं प्रगती करतो आहोत यात वाईट काही नाही. मात्र त्या प्रगतीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे याचाची विचार करायला हवा. सध्या देशात 5 जी नेटवर्कचे काम सुरु करण्याची चर्चा आहे. मात्र त्या नेटवर्कचा आपल्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार व्हायला हवा. असे जुहीनं म्हटलं आहे.

Juhi Chawala
स्कॅम 1992 चे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन
Juhi Chawala
लॉकडाऊनमध्ये टायगर - दिशा बाहेर पडले, पोलिसांनी अडवले

जुहीनं परखडपणे आपली बाजू मांडताना व्यक्ती, पर्यावरण आणि प्राणी यांच्यावर त्या नेटवर्कचा होणारा परिणाम याचिकेमध्ये नमूद केला आहे. याप्रकरणावर आदेश देताना न्यायाधीश जे आर मिढा म्हणाले की, न्यायालय जुहीनं दिलेल्या याचिकेवर विचार करणार आहे. याशिवाय आणखी ज्या चार याचिका आल्या आहेत, त्याचाही विचार न्यायालयाकडून केला जाणार आहे. यावेळी न्यायालयानं दुरसंचार विभागाची बाजु मांडणा-या वकिलांनाही आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन न्यायालयाला त्यावर आदेश देणं सोपं होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com