esakal | जुहीच्या कृतीवर न्यायालय नाराज, दंड भरण्यास दिला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Juhi Chawala

जुहीच्या कृतीवर न्यायालय नाराज, दंड भरण्यास दिला नकार

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला (actress juhi chawala) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं उच्च न्यायालयाच्या (high court) आदेशाचे केलेलं उल्लंघन. काही दिवसांपूर्वी जुहीनं 5 जी नेटवर्कच्या (5 g network) विरोधात न्यायलयात धाव घेतली होती. त्यावर दोनवेळा सुनावणीही झाली. मात्र जुहीनं या सुनावणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याची बाब समोर आली होती. या कारणास्तव न्यायालयानं तिला आठवड्याच्या आत वीस लाख रुपये भरण्यास सांगितले होते. ही रक्कम भरण्यास जुहीनं नकार दिला आहे. (new-delhi-city-ncr-delhi-high-court-expressed-surprise-on-the-behavior-of-actress-juhi-chawla-now-read-judges-big-comment )

जुहीच्या अशाप्रकारच्या कृतीमुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. तिच्याशिवाय आणखी जे याचिकाकर्ते आहेत त्यांचे वागणे चूकीचे असल्याचे निरीक्षण न्यायालयानं नोंदवले आहे. न्यायमुर्ती जेआर मिधा यांच्या पीठानं सांगितलं की, याचिकाकर्त्यांचा व्यवहार हा शोभनीय नाही. त्यांना दंडापोटी जी रक्कम भरायला सांगितली होती. त्यांनी ती अद्याप भरलेली नाही. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला आहे. 5 जी च्या विरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जुहीला उच्च न्यायालयानं 20 लाख रुपये भरण्याचा आदेश दिला होता.

न्यायपीठानं प्रतिक्रिया देण्यामागील कारण म्हणजे जुहीच्या वतीनं वरिष्ठ अधिवक्ता मीत मल्होत्रा यांनी दंडाची रक्कम माफ करण्यासाठी पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावर न्यायालय म्हणाले, एकतर तुम्ही निराधार प्रकारची याचिका दाखल करता, आणि दुसरीकडे दंडाची रक्कम भरण्यास तयारही नाही. न्यायालयाला दंड करण्याचा अधिकार नाही असं तुम्ही म्हणता, मात्र न्यायालयाजवळ अवमान याचिकेवर सुनावणी करण्याचा अधिकार आहे. हे लक्षात घ्यायला हवे.

हेही वाचा: बहिणीवर टीका केल्याने अली गोनी भडकला; रागाच्या भरात सोडलं ट्विटर

हेही वाचा: 'तू तिथे मी'; सुबोध भावेच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

दिल्ली हाय कोर्टामध्ये जुही चावला समवेत आणखी काही जणांची 5 जी च्या प्रकरणातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. जुहीनं त्या याचिकेवर पुर्नविचार करण्याची मागणी आता सर्वोच्च न्यायालयात केल्याचे समजते आहे. न्यायपीठान यावेळी असंही सांगितलं की, आपण आपल्या आतापर्यतच्या सेवेमध्ये अशाप्रकारची व्यक्ती पाहिली नाही की ज्यांनी आपली न्यायिक दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला.

loading image