esakal | मराठी 'डेस्पासिटो' ऐकलयं?, नाद खुळा भाऊ...

बोलून बातमी शोधा

luis fonsi despacito song
मराठी 'डेस्पासिटो' ऐकलयं?,नाद खुळा भाऊ...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - डिजिटलच्या युगात आता प्रत्येक गोष्ट वेगळ्या पध्दतीनं सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अतिशय कमी वेळेत हटक्या पध्दतीनं आपली सर्जनशीलता सोशल मीडियावर व्हायरल करण्याची संधी यानिमित्तानं उपलब्ध झाली आहे. सध्या सोशल मीडियावर एक गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते गाणं प्रसिध्द डिस्पासिटो या गाण्याचे ते मराठी व्हर्जन आहे. यापूर्वी देखील या गाण्याचे वेगवेगळ्या पध्दतीनं व्हर्जन्स तयार करण्यात आले होते. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र या गाण्याची बात काही औरच आहे. त्यामुळे त्याची चर्चाही तितक्याच जोरदारपणे सुरु आहे.

खास रे प्रस्तुतच्या वतीनं या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात सध्या जोरदारपणे उन्हाळा सुरु आहे. अशा परिस्थितीत काय करावं असा प्रश्न अनेक रसवंती आणि गु-हाळ विक्रेत्यांना पडला आहे. उन्हाळयाची चाहूल लागताच अनेकजण पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून रसवंतीगृह सुरु करतात. त्यातून दोन पैसे कमवून कुटूंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनामुळे सर्वच उद्योगव्यवसायांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. रोजगार गेला आहे, अनेक कुटूंबांनी पुन्हा आपल्या गावी स्थलांतर केले आहे. मोलमजुरी करणा-यांपुढे तर गंभीर प्रश्न आहे. अशावेळी मोठं संकट सर्वांसमोर आहे.

डिस्पासिटो या मराठी गाण्याच्या निमित्तानं एका रसवंती गृहाची जाहिरात करण्यात आली आहे. त्यात ज्या पध्दतीनं सध्याच्या परिस्थितीचा आढावा आणि दुसरीकडे रसवंती गृहाची करण्यात आलेली सुरुवात यांना अनोख्या शब्दांत मांडण्यात आले आहे. या रसवंती गृहामध्ये येण्यासाठी त्या गायकानं सर्वांना आवाहन केले आहे. त्यानं त्यासाठी डिस्पासिटो गाण्याची मदत घेतली आहे. साधारण चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यत 7.5 बिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. जगभरात या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे वेगवेगळ्या भाषेत व्हर्जन्सही तयार झाले आहेत.