
'यावेळी मी नाही..'; 'देवमाणूस' फेम किरणच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली होती. ऑगस्ट महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ही मालिका एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवमाणूस २' या नव्या मालिकेची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. या मालिकेचा प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र मालिकेच्या दुसऱ्या भागात डॉक्टरच्या भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड Kiran Gaikwad दिसणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. पहिल्या भागात किरणने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. या प्रश्नाचं उत्तर खुद्द किरणने त्याच्या इन्स्टा स्टोरीमधून दिला आहे. मात्र यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
किरणने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत लिहिलं, 'पण यावेळी मी नाही'. यामुळे 'देवमाणूस २'मध्ये तो दिसणार नाही, अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं जात आहे. वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेने आपल्या लोकप्रियतेने छोट्या पडद्यावरील टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. त्यामुळे आता मालिकेच्या नवीन भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा: कतरिनाने सलमानला दिलं लग्नाचं आमंत्रण? बहीण अर्पिता म्हणते..

'देवमाणूस'मध्ये डॉक्टर अजित कुमार देवचा मृत्यू न दाखवल्यामुळे या मालिकेचा पुढील भाग येणार याची कल्पना प्रेक्षकांना होती. त्यामुळेच आता 'देवमाणूस २' या दुसऱ्या सिझनमध्ये नक्की काय दाखवण्यात येणार आहे, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच झी मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'ती परत आलीये' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी 'देवमाणूस २' प्रसारित होणार आहे.
Web Title: Devmanus Fame Kiran Gaikwad Post About His Role In Devmanus 2
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..