लव्ह-जिहाद प्रकरणात फसलं गोपी बहूचं लग्न..भडकलेली देबोलीना म्हणाली,'माझा नवरा..'Devoleena Bhataacharjee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devoleena Bhataacharjee got angry in troller who called her marriage love jihad

Devoleena Bhataacharjee: लव्ह-जिहाद प्रकरणात फसलं गोपी बहूचं लग्न..भडकलेली देबोलीना म्हणाली,'माझा नवरा..'

Devoleena Bhataacharjee : छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच टी.व्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आपल्या विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. देवोलिना भट्टाचार्जीचं लग्न नेटकऱ्यांसाठी खूप मोठा वादाचा मुद्दा बनला होता.

देवोलीना भट्टाचार्जी गेल्या काही दिवसांपासून मालिका विश्वापासूनही दूर आहे. अर्थात बिग बॉसच्या घरात आपण तिला पाहिलं होतं. देवोलीनानं त्यानंतर अचानक शानवाज शेख सोबत लग्न करत सगळ्यांना हैराण केलं होतं.

गोपी बहू म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जीचा पती शानवाज शेख हा मुसलमान धर्मीय आहे. ज्यामुळे देवोलीनाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला किंबहुना आजही ती करते. (Devoleena Bhataacharjee got angry in troller who called her marriage love jihad)

यादरम्यान आता पुन्हा एकदा देवोलीना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावरील नेटकऱ्यांची शाळा घेतली आहे. काही दिवसांपूर्वी देवोलीनानं एका ट्वीटमधून सांगितलं होतं की तिनं आपल्या पतीसोबत 'द केरळ स्टोरी' पाहिला आणि तिला सिनेमा खूप पसंत आला. आता एका नेटकऱ्यानं त्यानंतर अभिनेत्रीच्या लग्नालाच लव्ह-जिहाद म्हटलं आहे.

आणि तिचा संताप झाला आहे,अर्थात हे तिच्या ट्वीटवरनं स्पष्ट झालं आहे. पण कोणत्याही चुकीच्या शब्दाचा वापर न करता अभिनेत्रीनं नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे.

या वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा ट्वीटरवर साध्वी प्राचीनं हरिद्वार,उत्तराखंडमध्ये 'द केरळ स्टोरी'च्या स्क्रीनिंगचे फोटो शेअर केले होते. तिनं लिहिलं होतं की,''हरिद्वार मध्ये मुलींना द केरळ स्टोरी मोफत दाखवला जाईल''.

ज्यानंतर नेटकऱ्यानं कमेंट करत थेट देवोलीनाच्या लग्नावर भाष्य केलं. ज्याच्यावर अभिनेत्रीनं कडक पलटवार केला आहे. देवोलिनानं लिहिलं आहे की,''अरे खान साब कोणाला बोलवायची गरज नाही. मी आणि माझ्या पतीनं आधीच 'द केरळ स्टोरी' पाहिला आहे आणि आम्हाला हा सिनेमा खूप आवडला''.

देवोलीना भट्टाचार्जीच्या नुसार ट्रु इंडियन मुस्लिम हे नाव ऐकलंय का कधी? तिचे पती अशा लोकांपैकी आहेत जे चुकीला चूक म्हणण्याची हिम्मत ठेवतात''.

''एक खरा मुसलमान तोच असतो आणि माझे पती त्यापैकी एक आहेत जे चुकीच्या गोष्टीविरोधात उभे राहतात आणि त्याविरोधात बोलायची हिम्मत ठेवतात''. आता देवोलीनाच्या या उत्तरामुळे तिचे चाहते मात्र तिची जोरदार प्रशंसा करताना दिसत आहेत.