धर्मेंद्र म्हणतायेत, ''हम को माफ़ी दे दो मालिक''

dharmendra.jpg
dharmendra.jpg

अभिनेते धर्मेंद्र यांनी काही दिवसांपुर्वी अभिनेत्री हेमा मालिनी यांची खिल्ली उडविणारे एक ट्विट केले होते. पण, बहूदा हे ट्विट हेमा मालिनी यांना आवडले नसावे. म्हणूनच की काय आता धर्मेंद्र यांनी त्याची माफी मागितली आहे. अभिनेते धर्मेंद्र याबाबत एक ट्विट करत हेमा मालिनींची खिल्ली उडवली होती.

दरम्यान, एका नेटकऱ्यांने धर्मेंद्र यांना “सर, मॅडमनी कधी आयुष्यात हातात झाडू पकडला आहे का?''असा प्रश्न ट्विटरवर विचारला होता. त्यावर कमेंट करत, ''हो, चित्रपटांमध्ये. मला पण अडाणीच वाटत होती'' असे धर्मेंद्र यांनी मजेशीर उत्तर दिले होते. धर्मेंद्र यांनी केलेली गंमत हेमामालिनी यांना बहूधा आवडली नसावी. म्हणूनच आता धर्मेंद्र यांनी 'त्या' ट्विटबद्दल हेमा मालिनीयांची माफी मागितली

‘कधी कधी मी काहीही बोलतो, या काहीही मागील भावना लोक काहीही समजातात यार.. झाडूची गोष्ट..कधी करणार नाही...देवा मला माफ कर’ असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटमध्ये त्यांनी हात जोडलेला एक जुना फोटो देखील शेअर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com