Video : ढिंच्याक पूजाचं 'होगा ना करोना' बघितलं का?

dhinchyak pooja new coronavirus song
dhinchyak pooja new coronavirus song

साऱ्या जगात कोरोनाची भीती पसरलेली आहे. त्याच्याशी संबंधित अफवा ही खूप पसरल्या आहेत. म्हणूनच प्रत्येक देशातील, राज्यातील सरकार आणि प्रशासनाने जनजागृती करून लोकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्ती कोरोना व्हायरसची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. 

सर्व जगात कोरोना व्हायरसची दहशत आहे.तब्बल १७६ देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरसची भीती असूनही त्याचे मिम्स, जोक्स सुद्धा सोशल मीडियावर अति प्रमाणात व्हायरल होत आहेत. अगदी गाणीही तयार केली जातात. मग रॅप क्विन ढिंच्याक पूजा कशी मागे राहिल... हिनेसुद्धा करोनाच्या जनजागृतीसाठी गाणं तयार केलंय, एकदा बघाच...

'होगा ना करोना' असं या गाण्याचं नाव आहे. हात तू धोना... होगा ना करोना असं या गाण्यातून सांगण्यात आलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला हे गाणं करोनाच्या जनजागृतीसाठी आहे असं एक निवेदन पण आहे. या व्हिडिओमध्ये करोनापासून बचाव कसा होईल हे दाखवले. करोनाच्या गाण्याचा व्हिडिओ ढिंच्याक पूजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

ढिंच्यॅक पूजाची  'दिलों का शूटर हैं मेरा स्कूटर', 'सेल्फी मैने ले ली आज', 'स्वॅग वाली टो' अश्याप्रकारची टुकार गाणी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. तीने 'बिग बॉस'मध्ये सुद्धा भाग घेतला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com