मलाईका, अर्जुन रामपाल, हृतिकनंतर 'या' अभिनेत्रीने घेतला घटस्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

बॉलिवूड कलाकरांच्या घटस्फोटांच्या यादीत आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचं नाव आता या यादीत जोडलं गेलं आहे. दिया मिर्झानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या गोष्टीचा खुलासा केला असून 5 वर्षांच्या संसारानंतर दियानं तिचा पती साहिल संघा याला घटस्फोट दिला आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये मागच्या काही काळापासून अनेक प्रसिद्ध जोड्यांची लग्नं तुटलेली पाहायला मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये अरबाज-मलाईका एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर अर्जुन रामपाल, हृतिक रोशन सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी घटस्फोट घेत अनेक वर्षांपासूनचं नातं संपवलं. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा सुद्धा झाली. कारण एवढ्या वर्षांचं नातं अशाप्रकारे तुटण्याची चाहत्यांना अपेक्षा नव्हती. या जोड्यांचे घटस्फोट झाल्यानंतरही काहींमध्ये अद्याप मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Related image

बॉलिवूड कलाकरांच्या घटस्फोटांच्या यादीत आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचं नाव आता या यादीत जोडलं गेलं आहे. दिया मिर्झानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या गोष्टीचा खुलासा केला असून 5 वर्षांच्या संसारानंतर दियानं तिचा पती साहिल संघा याला घटस्फोट दिला आहे.
 
Related image

दियाने म्हटलं आहे की, हे नातं संपलं असलं आम्ही वेगळे झालो असलो तरीही आमच्यामध्ये मैत्रीचं नातं कायम राहील असा उल्लेखही तिनं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dia mirza announces separation from husband sahil sangha after 11 years