'घटस्फोटातून मी अजुनही सावरत आहे' दिया मिर्जाचा पहिल्यांदाच खुलासा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री दिया मिर्जा पहिल्यांदाच तिच्या पर्सनल लाइफविषयी मोकळेपणाने बोलली आहे. यावेळी बोलताना दियाने तिच्या नात्याविषयी आणि घटस्फोटाविषयीही खुलेपणाने चर्चा केली आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये सतत काहीतरी हॅपनिंग हे घडतच असतं. ब्रेकअप, पॅचअप आणि लग्न याचा सिलसिला तर सुरुच असतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी हे नवनवीन ट्रेंड घेऊन येत असतात. काहींला लग्न केल्यावरही प्रेम झाले आहे. तर, काहींना घटस्फोनंटरही प्रेम मिळाले आहे. रिलेशनशिपविषयी अनेक कलाकारमंडळी खुलेपणाने बोलतात. बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री दिया मिर्जा पहिल्यांदाच तिच्या पर्सनल लाइफविषयी मोकळेपणाने बोलली आहे. यावेळी बोलताना दियाने तिच्या नात्याविषयी आणि घटस्फोटाविषयीही खुलेपणाने चर्चा केली आहे. जाणून घ्या दिया तिच्या घटस्फोटाविषयी काय म्हणाली.

'मै आपके साथ हूँ भी और नहीं भी' कॅन्सरशी लढा देणाऱ्या इरफानचा व्हिडीओ पाहाच

दियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिच्या पर्सनल लाइफविषयी चर्चा केली. गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2019 ला दियाने तिच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. पती साहिल संघापासून ती वेगळी झाली. याविषयी बोलताना दिया म्हणाली, '' मी फक्त ४ वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. इतक्या लहान वयात आई-वडिलांना वेगळे होताना पाहिले आणि तरीही मी ते सर्व सहन केले. पण, आज मी ३७ वर्षांची आहे आणि माझ्या घटस्फोटातून सावरत आहे. घटस्फोटानंतर जरी मार्ग वेगळे झाले असले तरी आयुष्यावर थोडा फरक पडतोच.''

Image may contain: 2 people, people standing

Image may contain: 2 people

साहिल आणि दिया बिझनेस पार्टनर्सही होते. मागच्या वर्षी सेपरेट होत असताना दियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. दियाने लिहिले होते, '' 11 वर्षांनंतर मी आणि साहिलने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे मित्र राहू, एकमेकांचा आदर आणि सन्मानही करु. यापुढील प्रवासाच्या वाटा वेगळ्या असतील पण, याआधी असलेल्या नात्यासाठी एकमेकांचे आम्ही आभारी आहोत. नातोवाईक, मित्रपरिवार  आणि मीडिया यांनी दिलेल्या पाठींब्यासाठी आम्ही आभारी आहोत. पण, त्याचसोबत एक विनंती अशी आहे की, थोडा मोकळा वेळ द्यावा.''

Image may contain: 2 people, people standing

Image may contain: 2 people

दिया आणि साहिल यांचं लग्न 18 ऑक्टोबर 2014 ला झालं होतं. साहिल आणि दिया बिझनेस पार्टनरर्सही होते. दिल्लीमध्ये त्याचं लग्न पार पडलं. दिया लवकरच सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तापसी पन्नूचा आागामी सिनेमा 'थप्पड' मधून दिया झळकणार आहे. त्याचा ट्रेलर रिलिज झाला असून 28 फेब्रुवारीला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dia Mirza spoke about her separation with Sahil Sangha