त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे डायना हेडनबाबत वादग्रस्त विधान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

....त्यावेळची विश्वसुंदरी स्पर्धा फिक्स होती. असे विप्लव देव यांचे म्हणणे आहे. 

भारतात महाभारताच्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जात होता, असे संशोधन करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी विश्वसुंदरी स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. 'मिस वर्ल्ड' डायना हेडन ही हा किताब कशी काय जिंकली?, त्यावेळची विश्वसुंदरी स्पर्धा फिक्स होती. असे विप्लव देव यांचे म्हणणे आहे. 

CM Viplav Dev

'आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणे मानतो. ऐश्वर्या राय भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करते. ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली ते योग्य आहे. मात्र 21 वर्षापूर्वी डायना हेडन कशी काय मिस वर्ल्ड बनली, हे समजण्यापलिकडे आहे', असे विधान विप्लव देव यांनी केले आहे. ऐश्वर्या राय हिच्यात भारतीय सौंदर्याचे सर्व गुण आहेत, असे म्हणत विप्लव देव यांनी तिचे कौतुक केले. 

'कॉस्मेटिक माफियांची भारतावर नजर आहे. सलग पाच वर्ष आम्ही ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ किताब जिंकले. ज्यांनी कुणी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, त्यांनी त्यांनी किताब पटकावले. डायना हेडनही यांपैकीच होती. मात्र खरंच ती ‘मिस वर्ल्ड’ किताब जिंकण्यास पात्र होती का?' असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला आहे. 

Miss World

अमेरिका किंवा पाश्चिमात्य देश नाही तर भारतानेच हजारो वर्षांपूर्वी इंटरनेटचा शोध लावला होता, असे विधान विप्लव देव यांनी काही दिवसापुर्वी केले होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्यशाळेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diana Haydens Miss World Crown Was A Pre Fixed Plan Says Tripura CM