डायना पेंटी बनली लष्करी अधिकारी 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

"कॉकटेल' चित्रपटातली साधी-सोज्वळ मीरा आणि "हॅप्पी भाग जाएगी'मधली हॅपी गो लकी गर्ल "हॅपी'च्या भूमिकेतली अभिनेत्री डायना पेंटी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिलीय.

आता ती एका नव्या ढंगात रूपेरी पडद्यावर झळकतेय. चक्क लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती दिसणार आहे. "परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण' असं सिनेमाचं नाव असून डायना त्याबाबत फारच एक्‍सायटेड आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक तिने ट्विटरवर नुकताच शेअर केलाय. सैन्याच्या वर्दीत असलेली डायना डॅशिंग दिसत असून तिने फारसा मेकअप केलेला नसल्याचे जाणवतं. "परमाणू...'तील पहिला लूक शेअर करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे, असं ट्विटही तिने केलंय.

"परमाणू' चित्रपट 8 डिसेंबरला झळकेल. त्याची पटकथा साइविन क्वेडरस आणि संयुक्ता चावला शेख यांच्या लेखणीतून साकारली आहे. चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे गुलदस्त्यात आहे. 
 
Web Title: Diana Penty became military officer