
लोकप्रिय व्यक्ती म्हणजे गीता कपूर. 'डान्स इंडिया डान्स' या शोची परिक्षक. गीताने लग्न केलं नाही पण, ती एका तरुणाला डेट करत आहे.
मुंबई : बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये लव्ह-अफेअर आणि ब्रेकअपचा सिलसिला हा कॉमन आहे. सेलिब्रिटींनी प्रेमाच्या सर्व सिमा पार करुन सिद्ध केलं आहे की प्रेमाला कोणतीच सिमा नसते. बॉलविवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांच्या वयामध्ये खूप अंतर आहे. पण तरीही सेलिब्रिटींनी स्वत: च्या प्रेमाला सिद्ध केलं आहे. अशीच एक लोकप्रिय व्यक्ती म्हणजे गीता कपूर. 'डान्स इंडिया डान्स' या शोची परिक्षक. गीताने लग्न केलं नाही पण, ती एका तरुणाला डेट करत आहे.
गीता ही एक सेलिब्रिटी, डान्स इंडिया डान्स शोची जज आणि उत्तम कोरिओग्राफर आहे. सेलिब्रिटींची अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी वयाचा विचार न करता प्रेम केलं आहे. प्रियांका चोप्रा आणि निकच्या नात्यामध्ये निक जोनस हा वयाने लहान आहे. किक्रेटर सचिन तेंडुलकर हा तिची पत्नी अंजलीपेक्षा वयाने लहान आहे आणि तरीही हे कपल चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये टॉप आहे. विश्वसुंदरी सुश्मिता सेनही 25 वर्षीय तरुणाला डेट करीत आहे.
गीता कपूरचं वय 44 असलं तरी मात्र ती सुंदर आणि आकर्षक दिसते. गीता डेट करीत असलेल्या तरुणाचं नाव आहे राजीव खिंची. राजीवदेखील गीताप्रमाणे कोरिओग्राफर आणि असिस्टंट दिग्दर्शक आहे. राजीव गीतापेक्षा वयाने लहान आहे. गीता तिच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने कधी बोलली नाही. पण, सोशल मीडियावर प्रियकर राजीवसोबतचे फोटो शेअर करत तिने प्रेमाचा खुलासा केला आहे.
लग्नाविषयी गीताला अनेकदा प्रश्न विचारण्यात आला आहे. पण, लग्न कधी करणार असल्याची माहिती तिने अद्याप दिलेली नाही. या दोघांना त्यांच्या नात्याविषयी विचारले असता ''आम्ही फक्त चांगले मित्र आहोत'' असं उत्तर देतात. मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टने लक्षात येते की ते दोघं डेट करत आहेत.