
सध्या बॉलीवूडचे स्थलांतर हा कळीचा मुद्दा आहे. त्यावरुन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्यानंतर त्या प्रश्नाला तोंड फुटले.
मुंबई - देशात केवळ बॉलीवूड नाही त्याच्याशिवाय आणखीही वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र त्यांच्याकडे कुणी पाहायला तयार नाही. त्याबद्दल फारसे कुणाला माहिती नाही. सध्या बॉलीवूडचे स्थलांतर हा कळीचा मुद्दा आहे. त्यावरुन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्यानंतर त्या प्रश्नाला तोंड फुटले. प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी आहे. दाक्षिणात्य चित्रपट आणि जिथून त्यांची निर्मिती होते अशा टॉलीवूडचा आढावा यानिमित्तानं घ्यावा लागेल.
योगी आदित्यनाथ यांनी आता उत्तर प्रदेशात मोठी चित्रपट इंडस्ट्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्तानं ते मुंबईत आले होते. मात्र ते आले बॉलीवूडला युपीला घेऊन जाण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चेला तोंड फुटले आणि मुळ प्रश्नावर उत्तर शोधायचे राहून गेले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. योगींवर टीका करण्यात आली. प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार याने बॉलीवूडच्या काही प्रश्नासंबंधी योगींची भेट घेतली. त्यामुळे त्याच्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले होते.
कुणीही यावं महाराष्ट्राला ओरबाडावं हे बरे नाही; बॉलीवूड महाराष्ट्रातून जाणार ?
बॉलीवूडला पोषक असे वातावरण मुंबईत आहे असे खुद्द त्या क्षेत्रात काम करणारे अनेकजण सांगतात. त्यात केवळ मराठीतले लोक आहेत असे नाही तर उत्तर प्रदेशातील कामगारांचा भरणा अधिक आहे. दक्षिण राज्यांतून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. तेव्हा त्यांच्यात सहकार्य आहे, सलोखा आहे तो काही आताचा नव्हे तर कित्येक वर्षांपासूनचा आहे. यासगळ्या गोष्टींची कल्पना राजकीय नेत्यांना नसते असे नाही. ती असताना देखील वेगळी ओळख आणि ठसा उमटविण्यासाठी त्यांचा चाललेला प्रयत्न अधिक डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे.
हे ही वाचा: गौहर आणि जैद 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, वेडिंग कार्डची चर्चा
योगी आदित्य हे बॉलीवूडला मुंबईपासून तोडणार अशी त्यांना भीती आहे. त्यात अक्षय कुमारने त्यांच्याशी केलेल्या बातचीत त्या घटनेला अधिक विश्वासार्ह बनविण्यास कारणीभूत ठरली. 1980 च्या दशकापासून मोठया प्रमाणात दक्षिणेत अनेक चित्रपट निर्मिती स्टूडिओ होते. त्याविषयी फारशी कुणाला माहिती नाही. 1990 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी उटी येथे एक मॅन फिल्म इंडस्ट्री सुरू केली. पुढे हैद्राबादमध्ये रामोजी फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली.
अभिनेता शरद केळकरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील फोटोची पुन्हा होतेय चर्चा
जेवारच्या होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर असणा-या ग्रेटर नोएडामध्ये 1 हजार एकरांवर पसरलेल्या योगींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची भीती आता अनेकांना वाटू लागली आहे. त्यात बॉलीवूडचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि आणखी काही निर्मात्यांनीही लखनौमध्ये त्यांच्या काही प्रोजेक्टची चर्चा केली आहे.
बॉलिवूड अनेक दशकांपासून हिंदी आणि मराठी सिनेमाचे केंद्रस्थानी राहिले आहे. आर.के. स्टुडिओ, राजकमल स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ हे मुंबईतील सर्वात जूने स्टूडिओ आहेत. आता तिथे यश राज स्टुडिओपासून ते धर्मा प्रॉडक्शनपर्यंतचे बॅनर आहेत आणि त्याचप्रमाणे नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या नवीन ग्लोबल ओव्हर-द-टॉप (ओटीटी) दिग्गजांची मुख्य कार्यालये देखील आहेत.
दुसरीकडे उत्तरेकडील प्रादेशिक चित्रपट उद्योग वेगाने वाढले आहेत. भोजपुरी उद्योग, एकासाठी वर्षात 100 हून अधिक चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहेत. आतापर्यंत बहुतांश प्रादेशिक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाच्या पूर्व आणि उत्तरोत्तर कामांसाठी मुंबईला जावे लागणार आहे. यामुळे त्यांच्या बजेटमध्ये भर पडली आहे.अलीकडच्या काळात, बॉलिवूड सिनेमांचे शूटिंग यु.पी. आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांत होत आहे. कारण शहरे कमालीची गजबजलेली आहेत. त्यात चित्रिकरण शक्य नसल्यांनी तो पर्याय स्वीकारला आहे.