नव्या दोस्तीची नवी गोष्ट 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

"मस्ती नाय तर दोस्ती नाय' हा फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका "दिल दोस्ती दुनियादारी'च्या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे. नवा सीझन "दिल दोस्ती दोबारा' या नव्या नावासोबत रसिकांच्या भेटीला येत आहे. 18 फेब्रुवारीपासून रात्री साडेदहा वाजता "झी मराठी'वर ही मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेची नवी गोष्ट माजघरात नाही, तर एका रेस्टॉरंटमध्ये रंगणार आहे. या रेस्टॉरंटचे नाव आहे "खयाली पुलाव रेस्टॉरंट'.

"मस्ती नाय तर दोस्ती नाय' हा फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका "दिल दोस्ती दुनियादारी'च्या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे. नवा सीझन "दिल दोस्ती दोबारा' या नव्या नावासोबत रसिकांच्या भेटीला येत आहे. 18 फेब्रुवारीपासून रात्री साडेदहा वाजता "झी मराठी'वर ही मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेची नवी गोष्ट माजघरात नाही, तर एका रेस्टॉरंटमध्ये रंगणार आहे. या रेस्टॉरंटचे नाव आहे "खयाली पुलाव रेस्टॉरंट'. आता खयाली पुलावच्या माध्यमातून मैत्रीची कोणती नवी डिश ते सादर करतील, याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली आहे. 
 

Web Title: Dil Dosti Dobara is back