'या' कारणामुळे लग्नाचा ५४ वा वाढदिवस साजरा नाही करणार दिलीप कुमार, सायरा बानो यांनी दिली माहिती

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 9 October 2020

या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी तो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो या वर्षी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी तो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण म्हणजे कोरोनाच्या संसर्गामुळे दिलीप कुमार यांचे दोन्ही लहान भाऊ एहसान आणि असलम यांचं निधन झालं. त्यामुळे दिलीप कुमार यांनी वाढदिवस साजरा करण्याला नकार दिला आहे. सायरा बानो यांनी ट्विटरवरुन याबाबात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय, '११ ऑक्टोबर नेहमीच माझ्या आयुष्यातील उत्तम दिवस राहिला आहे. दिलीप साहेब यांनी या दिवशी माझ्याशी लग्न केलं आणि माझं स्वप्न साकार केलं. मात्र यावेळी आम्ही हा आनंदा साजरा करणार नाही आहोत कारण सगळ्यांनाच माहित आहे की त्यांनी त्यांच्या दोन्ही लहान भावांना कोरोनामुळे गमवलं आहे.' 

हे ही वाचा: अभिनेता विकी कौशल 'या' भूमिकेसाठी १०० किलोपेक्षा जास्त वजन वाढवणार   

dilip kumar will not celebrate his 54th wedding anniversary with saira banu in this year

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip kumar will not celebrate his 54th wedding anniversary with saira banu in this year