रामायणातील सीतेचा अवतार एकदा पहाच;युजर्सलाही बसला धक्का

अभिनेत्री दिपिका चिखलिया नेहमीच सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करतात.
Dipika Chikhlia
Dipika ChikhliaGoogle

रामानंद सागर यांच्या रामायण(Ramayan) या मालिकेनं टी.व्ही इंडस्ट्रीत एक इतिहास रचून ठेवलाय असं म्हटलं तर अतिश्योक्ती नक्कीच होणार नाही. बघा नं,आज त्या मालिकेनंतर रामायण अनेक स्वरुपात पुन्हा भेटीस आलं पण रामानंद सागर यांच्या रामायणातली गोडी काही वेगळीच. तो एक काळ होता की की रामायण मालिकेची वेळ झाली की प्रेक्षकवर्ग हातातलं काम सोडून टी.व्ही समोर खिळून बसायचा. यातील राम,सीता(Seeta) या भूमिका साकारलेल्या कलाकारांना तर लोकांनी प्रत्यक्षात देव मानून पूजलेही आहे. याचे किस्से स्वतः त्या कलाकारांनी अनेक कार्यक्रमातून सांगितलेले. त्यामुळे अर्थातच लोकांच्या मनात या कलाकारांची छबी देवाच्या रुपातच तयार झालेली. त्यामुळेच की काय आता रामायण मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या दिपिका चिखलिया(Dipika Chikhlia) यांना सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय.

दिपिका चिखलिया या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्या नेहमीच आपले ग्लॅमरस अंदाजातले फोटोही सोशल मीडियावर शेअर करीत असतात. पण आजही लोकांच्या मनात दिपिका यांची छबी सीतेचीच असल्यामुळे अनेकदा त्यांना लोकांच्या रोषाचाही सामना करावा लागतो. नुकताच दिपिका यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांचा बॅक लूक फोटोत दिसत आहे. स्टाईल अंदाजात कॅमेऱ्याकडे पाठमोऱ्या त्या उभ्या आहेत. त्यांनी कफ्तान परिधान केलेला आहे. केसाचा स्टायलिश बन बांधून त्या समोरच्या निसर्गाचा आनंद घेताना फोटोत दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने तर चक्क म्हटलंय,''इतकं सुंदर दिसायची तुमची हिम्मतच कशी झाली?'' आता काय म्हणायचं राव...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com