दीपिकाला कमिटमेंटची भीती?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

रणवीर लग्नासाठी एकदम उत्साही आहे आणि त्याने हे अनेकदा बोलून दाखवले आहे; पण दीपिकाने याबाबतीत कधीच उत्साह दाखवलेला नाही.

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अनेक मोठ-मोठ्या कलाकारांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजले; पण गेल्या वर्षापासूनच रणवीर-दीपिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या दोघांकडून लग्नाबाबत तसे काही कळलेले नाही. नुकतेच या दोघांचे लग्न नोव्हेंबर मध्ये स्वित्झर्लंडला होणार, अशा अफवाही पसरल्या होत्या; पण त्या फोलच ठरल्या.

deepika padukone

दोघांकडूनही कसलेच कर्न्फ्मेशन आले नाही. खरं तर रणवीर लग्नासाठी एकदम उत्साही आहे आणि त्याने हे अनेकदा बोलून दाखवले आहे; पण दीपिकाने याबाबतीत कधीच उत्साह दाखवलेला नाही. रणवीरआधी तिचं नाव रणबीरवरशी जोडलं गेलं. रणबीरबरोबर तिला लग्नही करायचं होतं म्हणे! पण त्याच्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिला कमिटमेंटची भीती वाटायला लागली की काय, अशी शंका येतेय. बाकी ती आणि रणवीरच जाणो!

Web Title: dipika have fear of commitment

टॅग्स