रेडिओ जॉकी बनून दिप्ती देवी खेळणार नवी इनिंग

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. खरेतर ती वास्तवात जाॅका बनलेली नाही. तर तिच्या आगामी सिनेमातून ती रेडीओ जाॅकी बनून येते आहे. कंडिशन्स अप्लाय असे या सिनेमाचे नवा असून गिरीश मोहिते यांनी हा सिंनेमा दिग्दर्शित केला आहे. 

मुंबई ; मराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हणजे ‘आरजे’ बनून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. खरेतर ती वास्तवात जाॅका बनलेली नाही. तर तिच्या आगामी सिनेमातून ती रेडीओ जाॅकी बनून येते आहे. कंडिशन्स अप्लाय असे या सिनेमाचे नवा असून गिरीश मोहिते यांनी हा सिंनेमा दिग्दर्शित केला आहे. 

या चित्रपटात दिप्ती ‘आरजे’ स्वरा हळदणकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘आरजे’ च्या भूमिकेत शिरलेली दिप्ती सांगते की, ‘आरजे’ ची भूमिका ही चॅलेंजिंग व तितकीच इंटरेस्टिंग असते. स्वत:सोबत इतरांची मनं आणि मतं जाणून घ्यायची जबाबदारी ‘आरजे’वर असते. या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. स्वतंत्र विचारसरणीच्या स्वराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टींकडे आजची पिढी कशा पद्धतीने पहाते यावर कंडिशन्स अप्लाय हा सिनेमा भाष्य करतो.

कंडिशन्स अप्लाय मध्ये दिप्ती देवी सोबत सुबोध भावे, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय पवार यांचे आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचं असून संकलन निलेश गावंड यांचं आहे. 

Web Title: Dipti devi esakal news