बागेश्वर धामवर चित्रपट येणार! 'या' निर्मात्याने केली घोषणा..Film on Bageshwar Dham | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Film on Bageshwar Dham

बागेश्वर धामवर चित्रपट येणार! 'या' निर्मात्याने केली घोषणा..Film on Bageshwar Dham

Film on Bageshwar Dham: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम हे असं ठिकाण आहे जे आता साऱ्या भारताला माहित आहे. हे नाव आता जगालाही कळले आहे. बागेश्वर सरकारला परिचयाची गरज नाही. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरतो.

यात धीरेंद्र शास्त्री हे येणाऱ्या भाविकांची मने वाचण्याचा दावा करतात. बागेश्वर धामची अशी चमत्कारिक शक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. पंडित धीरेंद्र शास्त्री देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या त्यांच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात आणि सनातन धर्माला देशात योग्य स्थान देण्या बद्दल ते बोलतात.

बागेश्वर धामबद्दल लोकांची श्रद्धा अशा प्रकारे जागृत झाली आहे की आता बॉलीवूडचंही लक्ष त्याच्याकडे लागले आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते अभय प्रताप सिंग यांनी लवकरच बागेश्वर धामवर चित्रपट बनवण्यास सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे.

दिग्दर्शक अभय प्रताप सिंग यांनी बागेश्वर धामच्या धार्मिक महत्त्वावर चित्रपट बनवून त्यांचे धार्मिक, मानवतावादी आणि सामाजिक कार्य सिनेमातून मांडणार असल्याच सांगितलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाव्यतिरिक्त अभय प्रताप सिंग हे या चित्रपटाचे लेखक देखील आहेत. हा चित्रपट 'एपीएस पिक्चर्स' प्रस्तुत करणार आहे.

अभय प्रताप सिंग दिग्दर्शित या चित्रपटाचे नावही 'बागेश्वर धाम' असेच असा दावा करण्यात येत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे नावही नोंदणीकृत केले आहे.

इंडिया टीव्हीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर बनत असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर 'बागेश्वर धाम'ही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.