सुशांत म्हणाला होता, अपनी दुनिया समेट रहा हुँ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

केदारनाथ चित्रपट रिलीज होऊन दोन वर्ष झाल्यामुळे दिग्दर्शक अभिषेक कपूरने ट्वीटरवर सुशांतच्या हाताचा फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये बरेच काही लिहिलेले आहे. धर्म, विवाद, वचन, देव आणि जीवन यासारख्या अनेक गोष्टी तळहातावर स्पष्टपणे दिसत आहेत. 

मुंबई :  बॉलिवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आज या जगात नसला तरीही त्याला अजूनही कुणी विसरू शकत नाही. सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन सहा महिने झाले तरीही त्याचे चाहते अजूनही त्याची आठवण काढत आहे. नेहमीच सोशल मीडियावर सुशांतचे काही ना काही अपडेड सुरु असतातच. त्याचे फॅन्स फॉलवर्स त्याचे फोटो ही शेयर करता असतात. त्यातच सध्या सुशांतच्या केदारनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी एक फोटो शेयर केला असून तो फोटो खूप व्हायरल होत आहे.  

केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ट्विटवर फोटो शेयर केला आहे. यात सुशांतच्या हातावर काही शब्द लिहिलेले आहेत. हा फोटो शुटींगच्या वेळेस त्याच्या हातावर दिसून आला आहे. केदारनाथ चित्रपट रिलीज होऊन दोन वर्ष झाल्यामुळे दिग्दर्शक अभिषेक कपूरने ट्वीटरवर सुशांतच्या हाताचा फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये बरेच काही लिहिलेले आहे. धर्म, विवाद, वचन, देव आणि जीवन यासारख्या अनेक गोष्टी तळहातावर स्पष्टपणे दिसत आहेत. 

 

या फोटोला शेयर करत अभिषेकने एक कॅप्शन टाकलेला आहे. त्यात असे लिहिले आहे कि, 'मला आठवते जेव्हा मी स्टोरी सांगत होतो आणि आम्ही मन्सूरबद्दल चर्चा करत होतो. त्यावेळेस सुशांत हातावर काहीतरी लिहित होता. मी विचारलं काय लिहीत आहेस. तो म्हणाला मी माझे जग व्यापतो आहे' अभिषेकच्या या पोस्टनंतर सुशांतच्या हाताचे हे चित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

'केदारनाथ' चित्रपटाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या चित्रपटात सारा अली खान सुशांतसोबत दिसली होती. या चित्रपटात या दोघांचे अफेअरही समोर आले होते. सारा अली खानने या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटाची गाणी खूप हिट झाली आणि सुशांतच्या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Abhishek Kapoor has shared a photo of a message written on the hand of Bollywood star Sushant Singh Rajput on Twitter