'रक्तधार' नंतर दिग्दर्शक अजित वर्मा यांचा नवीन चित्रपट 'दाखिला' ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे 'दाखिला'.

गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे 'दाखिला'.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर अनावरीत करत, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत, चित्रपटाची घोषणा करण्यात आली. लेखक दिग्दर्शक अजित वर्मा यांच्या मते सद्यस्थितीत आपल्या देशातील संविधानावर घाला पडेल अशी कृत्ये होत आहेत व या चित्रपटाच्या माध्यमातून ते सरकार आणि आम जनतेला ते जाणवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या देशातील जेल प्रशासनाच्या कारभारावर ते यातून भाष्य करणार आहेत. 

भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. दुधात माशी पडल्यावर सर्व दूध खराब होते त्याचप्रमाणे एखाद दुसऱ्या भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी वा पोलीस अधिकारी अथवा राजकारणी यांच्यामुळे समस्त देश रसातळाला जाण्याची शक्यता असते. 'दाखिला'चे लेखक दिग्दर्शक या गोष्टी अधोरेखित करताना प्रशासनालाही त्याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न करेल. यासंदर्भात बोलताना वर्मा म्हणाले की 'प्रेक्षकांना मुंबईतील गॅंग वॉर वर बरेच चित्रपट बघायला मिळाले. परंतु, माझ्या मते, खरं माफिया राज यू पी आणि बिहार मध्ये आहे. माझ्या 'दाखिला' मधून याचं वास्तव प्रेक्षकांसमोर येईल आणि त्यात वेगळेपण असेल याची ग्वाही मी देतो. हा चित्रपट द्वैभाषिक असून हिंदी आणि तामिळ भाषांमध्ये एकाच वेळी चित्रित होईल. तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आणि  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा अनोखा संगम या चित्रपटातून अनुभवायला मिळेल'.

तिरुपती प्रॉडक्शन्स आणि आरात एंटरटेनमेंट्स च्या बॅनरखाली 'दाखिला' बनत असून चंद्रशेखर एस के आणि राजेश मुंगलू याची निर्मिती करीत आहेत. चंद्रशेखर एस के यांनी बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केलेली असून हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. निर्माते राजेश मुंगलू वेगळ्या प्रकारे हिंदी चित्रपटसृष्टीचा हिस्सा असून ते चंद्रशेखर यांना पाठबळ देताहेत. या चित्रपटात सूर्यदेव मलिक पदार्पण करीत असून राज चौहान, संदीप भारद्वाज ('वीरप्पन' मधील यांची भूमिका खूप गाजली होती) शाहबाझ खान, राजपाल यादव, सुप्रिया कर्णिक आणि दाक्षिणात्य सिनेमांतील प्रसिद्ध रियाझ खान व संचिता बॅनर्जी यांच्या महत्वपूर्ण भूमिका असतील. 

'दाखिला' चं चित्रीकरण २५ एप्रिल २०१८ पासून सुरु होत असून येत्या ऑगस्ट पर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: director ajit verma s another movie dakhila after raktadhar