esakal | लहान मुलांसाठी हवा स्वतंत्र कोविड वॉर्ड; दिग्दर्शक सतीश कौशिक यांची पोस्ट

बोलून बातमी शोधा

director and producer satish kaushik demands proper covid19 children hospital his daughter vanshika positive

सतीश कौशिक आणि त्यांची मुलगी हे दोघेही सध्या कोरोनामुक्त झाले आहेत.

लहान मुलांसाठी हवा स्वतंत्र कोविड वॉर्ड; दिग्दर्शक सतीश कौशिक यांची पोस्ट
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माते  आणि अभिनेते सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते घरीच क्वॉरंनटाईन झाले होते. आता सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. त्या लाटेनं सर्वांची डोकेदुखी वाढवली आहे. मोठ्यांपासून लहान मुलांनाही कोरोनानं आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली आहे. कौशिक यांच्या मुलीला कोरोना झाला होता. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासगळ्या परिस्थितीवर कौशिक यांनी य़ापुढील काळात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविडचा वॉर्ड असणे गरजेचे आहे. काळाची ती आवश्य़कता आहे. या सुचनेचा आरोग्य प्रशासनाबरोबर सर्व रुग्णालयांनीही विचार करावा. असेही कौशिक यांनी म्हटले आहे. त्यांची ही सुचना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सतीश कौशिक आणि त्यांची मुलगी हे दोघेही सध्या कोरोनामुक्त झाले आहेत. कौशिक यांची आठ वर्षांची वंशिका ही काही दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती एका महिन्यानंतर पुन्हा घरी परतली. त्यावेळी कौशिक यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, लहान मुलांना रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांच्यावर एक पालक म्हणून आपण लक्ष ठेवणं हे अवघड असते. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये तर पालकांना आणखी कसरत करावी लागते. त्यासाठी काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. 
पालकांना माझे सांगणे आहे की, त्यांनी लहान मुलांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी.

खासकरुन सध्याच्या कोविडच्या दुस-या लाटेमध्ये तर त्यांना आणखीनच जपावे लागेल. कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी फार भयानक ठरते आहे. त्याचा सर्वांनी विचार करावा. लहान मुलांना या लाटेतून वाचविण्यासाठी आरोग्य प्रशासनाला गांभीर्यानं विचार करावा लागेल. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात स्पेशल वॉर्ड तयार करणं आवश्यक आहे. सध्या असे चित्र कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे तातडीनं परिस्थिती बदलावी लागणार आहे. ज्यावेळी लहान मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार केला जाईल तेव्हा तिथे बालरोग तज्ञांची टीम तैनात ठेवावी लागेल. असेही कौशिक यांनी यावेळी सांगितले.