इम्तियाज अली करत आहे ऑस्ट्रेलियन शेफला डेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

सारा ही 'मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सिजन-6' ची कन्टेंस्टंट आहे. सारा इम्तियाज पेक्षा 14 वर्षांनी लहान आहे.

जब वी मेट, रॉकस्टार, तमाशा, हायवे सारख्या हिट सिनेमांचा डंका वाजवणारे दिग्दर्शक इम्तियाज अली सध्या त्यांच्या अफेअरमुळे चांगलेच चर्चेत आहे. इम्तियाज एका सेलिब्रिटी शेफला डेट करत आहे. सोशल मिडीयावर या जोडीचा फोटो वायरल होत आहे. या फोटोत इम्तियाज ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ सारा टॉड सोबत दिसत आहे. 

सारा ही 'मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सिजन-6' ची कन्टेंस्टंट आहे. सारा इम्तियाज पेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. सारा 32 वर्षाची तर इम्तियाज 46 वर्षाचे आहेत. सारा ही सिंगल मदर आहे. इम्तियाजचे 2002 मध्ये प्रिती अली हिच्याशी लग्न झाले होते. 2012 मध्ये हे जोडपे विलग झाले. इम्तियाज आणि प्रितीची एक मुलगी आहे. जी इम्तियाज सोबत राहते. 
 

Imtiaz And Daughter

सारा 2014 मध्ये झालेल्या फूड बिजनेसमध्ये सक्रिय होती आणि तिने मॉडेलिंगही केले आहे. सारा एका रेस्टोरंटची मालकीण आहे. दोघांकडुनही सध्या कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Imtiaz Ali Dating Celerity Chef Sarah Todd