मेघना गुलजारने सोडलं मौन, दीपिकाच्या जेनेयु पाठींब्यावर म्हणाली...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

जेव्हापासून 'छपाक' गर्ल दीपिका पदुकोन जेएनयुमध्ये भेट देऊन आली, तेव्हापासून तिच्याबाबतीत काही ना काही घडतच आहे. आता मात्र तिच्या या अॅक्शनवर 'छपाक' ची दिग्दर्शक मेघना गुलजारने मौन सोडलं असून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

मुंबई : जेव्हापासून 'छपाक' गर्ल दीपिका पदुकोन जेएनयुमध्ये भेट देऊन आली, तेव्हापासून तिच्याबाबतीत काही ना काही घडतच आहे. ती जेएनयुमधील हिंसाचारानंतर तिथे गेली म्हणून देशभरातून तिच्यावर टीका केली. तिच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार घाला असे सांगण्यात आले. तर काही जण तिच्या पाठिशी उभे राहिले. दीपिकाला सर्वच स्थारातून फटका बसला आहे. आता मात्र तिच्या या अॅक्शनवर 'छपाक' ची दिग्दर्शक मेघना गुलजारने मौन सोडलं असून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

जेएनयुमध्ये गेल्याने दीपिकाला कोट्यवधींचा फटका, कसा काय?

Image may contain: 6 people, night and indoor

मेघना गुलजार यांनी पीटीआयला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये मेघना म्हणाली, '' वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य माणसाने वेगळंच ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने खासगी आयुष्यात काय केलं आणि त्य़ाचबरोबर त्याची व्यावसायिक कामगिरी कशाप्रकारची आहे हे पाहण्याची दृष्टीही वेगळी असली पाहिजे. जे लोक पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या नजरेने पाहण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी थोडं लक्ष चित्रपटाच्या कथेवर आणि त्याच्या गांभीर्याकडेही दिलं पाहिजे.'' अशाप्रकारे दिग्दर्शक मेघना गुलजारने दीपिकाच्या अॅक्शनला पाठींबा दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Chhapaak In cinemas now!

A post shared by Malti (@deepikapadukone) on

जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच, बॉलिवूडची मंडळीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. अशातच 'छपाक'गर्ल दीपिका पदुकोन काल (ता. 7) थेट जेएनयुमध्ये पोहोचली. तिच्या या आंदोलनात सहभागी होण्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. #boycottchhapaak असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. तिचा 'छपाक' चित्रपट कोणीही बघू नका असे आवाहन सोशल मीडियावर केले गेले. 

डॉक्टरकडून परतले बिग बी आणि म्हणाले 'डावा डोळा फडफडणं अशुभ असतं'

दीपिकाला कोट्यावधींचा फटका...

तिच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार घाला असे सांगण्यात आले. तर काही जण तिच्या पाठिशी उभे राहिले. पण असाही निर्णय झाला, ज्याचा दीपिकाला चांगलाच फटका बसणार आहे. 'नवभारत टाइम्स';च्या वृत्तानुसार, दीपिका या कॉन्ट्रॉव्हर्सीमध्ये अडकल्यापासून ती ज्या ब्रण्डच्या जाहिरातीत काम करते अशा जाहिराती सर्व जाहिरात कंपनीने कमी प्रमाणात दाखविण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी हे प्रकरण निवळेपर्यंत दीपिकाच्या जाहिरातीच दाखवायच्या नाहीत, असा चंगच बांधला आहे. तसेच या प्रकरणावरून जाहिरात कंपन्यांनी अभिनेते/ अभिनेत्रींसोबत करार करताना नवा क्लॉज तयार केला आहे. 'कोणतीही कंपनी त्यांच्या ब्रॅण्डची गुणवत्ता स्थिर राहावी याचा विचार करते. त्यामुळे कोणत्याही वादाचा आपल्या कंपनीला फटका बसू नये यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते,' असे कोका-कोला आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director meghna gulzar reaction on deepika JNU visit