
मोठ्या पडद्यावर अ वेन्स्डे, स्पेशल 26, बेबी, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी, सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणा-या दिग्दर्शक नीरज पांडे यांची स्पेशल ऑप्स नावाची मालिका फार लोकप्रिय झाली.
मुंबई - भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ज्या काही वेब सीरिज आहेत त्यात स्पेशल ऑप्स य़ा मालिकेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पहिल्या मालिकेचा भाग प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला. त्यानंतर त्याच्या दुस-या भागाचे वेध सर्वांना लागले होते. आता प्रेक्षकांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण या मालिकेचे दिग्दर्शक नव्य़ा सीझनची घोषणा करणार आहेत.
मोठ्या पडद्यावर अ वेन्स्डे, स्पेशल 26, बेबी, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी, सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणा-या दिग्दर्शक नीरज पांडे यांची स्पेशल ऑप्स नावाची मालिका फार लोकप्रिय झाली. आतापर्यत ज्या काही भारतीय मालिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरल्या त्यात स्पेशल ऑप्सचे मालिकेचा उल्लेख करावा लागेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीरज पांडे या मालिकेचा दुसरा सीझन आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं ते या मालिकेच्या दुस-या सीझनची घोषणा करणार आहेत.
नीरज पांडे यांच्या स्पेशल ऑप्स या मालिकेचा पहिला भाग मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांबरोबर समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. पांडे यांनी दुस-या भागाची पटकथा पूर्ण केली आहे. त्यासाठी त्यांनी पहिल्य़ा भागाप्रमाणेच दुस-या भागाकरिता भरपूर संशोधन केले आहे. ते मंगळवारी म्हणजे 26 जानेवारी रोजी दुस-या भागाची घोषणा करणार आहेत. अद्याप त्याविषयी आणखी काही माहिती मिळालेली नाही. मालिकेच्या चित्रिकरणाला फेब्रुवारीला सुरुवात होणार असून ती जूनपर्यत चालणार आहे. चित्रिकरणासाठी नीरज यांनी काही देशांची निवड केली आहे. जिथे चित्रिकरण होणार आहे.
'व्हाईट टायगरच्या प्रदर्शनावर बंदी नाही, न्यायालयाचा नकार
स्पेशल ऑप्सच्या पहिल्या सीझनमध्ये केके मेनन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याशिवाय सना खान, सज्जाद डेलाफ्रुज, करण टेकर, सैयामी खेर यांच्याही भूमिका आहेत. सना खान यांनी आपण मनोरंजन क्षेत्र सोडणार असल्याचे यापूर्वी सांगितले असल्यानं ती दुस-या सीझनमध्ये दिसणार नाही. तसेच काही नवीन चेहरे या मालिकेत दिसणार आहेत. स्पेशल ऑप्स ही एका गुप्चहेर संघटनेची कथा आहे. त्यात ऑफिसर हिंमत सिंह आणि त्याच्या बाकीच्या सहका-यांचे सिक्रेट मिशन दाखविण्याता आले आहे. देशाच्या सुरक्षेला कुठलाही धोका पोहचु नये यासाठी जीवावर उदार होऊन अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे काम हिम्मत सिंह यांची टीम करते.