#HyderabadEncounter : पोलिसांच्या भूमिकेवर प्रविण तरडे काय म्हणाले !

Director Pravin tarde reaction on Hyderabad Encounter
Director Pravin tarde reaction on Hyderabad Encounter

मुंबई : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळी तपासणी करण्यासाठी चारही आरोपींना नेण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांकडून त्यांचा एन्काउंटर करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसावर मिश्र प्रतिक्रिया  येत असतानाच अनेकांनी  कौतुकाचा वर्षाव केला आहे. सेलिब्रिटी ते सामान्यांपासून सर्वचजण सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनीही त्यांची प्रतिक्रिया फेसबूकवरुन दिली आहे. 

प्रविण तरडे यांनी संबंधीत प्रकरणावर आणि पोलिसांच्या धाडसावर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे, 'हैद्राबाद मधे खरी शिवशाही ...जागेवर फैसला'. अशाप्रकारे पोस्ट शेअर करत त्यांनी पोलिसांच्या कृतीचं समर्थन केलं आहे. 

प्रविण तरडे अनेकदा सामाजिक, राजकीय किंवा इतर विषयांवर खुलेपणाने आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. प्रविण यांनी काही महिन्यांपूर्नवीच त्यांचा आगामी चित्रपट 'सरसेनापती हंबीरराव' याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख अद्याप समोर आली नसली तरी जानेवारी 2020 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

चारही आरोपींचा त्याच जागी एन्काऊंटर 
हैदराबादमध्ये 26 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्यात आले होते. या घटेनेने संपूर्ण देश हादरला आणि त्याचा निषेध व्यक्त करत होता. सोशल मीडियावरुन रोष व्यक्त केला गेला. त्यानंतर आठवड्याभरात तिच्या आरोपींचा एन्काउंटर करण्यात आल्याने देशाभरातून हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com