संतोष मांजरेकरची हॅट्ट्रिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' आणि "सुराज्य' हे दोन्ही वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट बनविणारा हरहुन्नरी दिग्दर्शक संतोष मांजरेकर आता तिसरा चित्रपट आणतोय. ही त्याची मराठीमधली हॅट्ट्रिक असेल.

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' आणि "सुराज्य' हे दोन्ही वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट बनविणारा हरहुन्नरी दिग्दर्शक संतोष मांजरेकर आता तिसरा चित्रपट आणतोय. ही त्याची मराठीमधली हॅट्ट्रिक असेल.

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट त्याने सन 2009 मध्ये दिग्दर्शित केला होता. त्यानंतर सन 2014 मध्ये त्याचा "सुराज्य' चित्रपट दिग्दर्शित केला होता. या दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे होते. "मी शिवाजीराजे...'ने चांगली कमाईही केली होती. आता संतोष चक्क ऍक्‍शनपॅक्‍ड चित्रपट घेऊन येत आहे. "बेधडक' असे त्याचे नाव आहे. 1 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खरे तर एखादा ऍक्‍शनपॅक्‍ड चित्रपट हिंदीमध्ये बनवायचा झाला तर कित्येक महिने लागतात; मात्र हा चित्रपट फक्त 32 दिवसांत पूर्ण करण्यात आला.

bedhadak

संतोषचा अशा प्रकारे ऍक्‍शन चित्रपट बनविण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट बॉक्‍सिंगशी संबंधित आहे हे स्पष्ट होतेय. या चित्रपटात गिरीश टावरे, सुश्रुत मंकणी, अशोक समर्थ, गणेश यादव, अनंत जोग, नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे असा कलाकारांचा ताफाच आहे. 

Web Title: director santosh manjarekar come up with his third marathi movie